शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

औरंगाबाद जिल्ह्यात पावसाच्या आगमनामुळे पेरणीची लगबग सुरु 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 13:51 IST

शेतकऱ्यांची पेरण्यांसाठी लगबग सुरू झाली असून, आतापर्यंत अवघ्या ७ हजार १८२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यामध्ये ४ हजार ९०५ हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. 

ठळक मुद्दे यंदा पावसाने उशिरा हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या

औरंगाबाद : यंदा पावसाने उशिरा हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या असून, मागील तीन दिवसांत झालेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. शेतकऱ्यांची पेरण्यांसाठी लगबग सुरू झाली असून, आतापर्यंत अवघ्या ७ हजार १८२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यामध्ये ४ हजार ९०५ हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. 

या संदर्भात जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार म्हणाले की, जिल्ह्यामध्ये आतापर्यंत औरंगाबाद आणि फुलंब्री तालुके वगळता अन्य एकाही तालुक्यात १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झालेला नाही. १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असे कृषी विभागाने आवाहन केले होते. असे असले तरी फुलंब्री आणि सिल्लोड या दोन तालुक्यांत कापसाची पेरणी बऱ्यापैकी झाली आहे.

यामध्ये औरंगाबाद तालुक्यात आजपर्यंत कापसाची लागवड ३५ हेक्टर, पैठण तालुक्यात ११८ हेक्टर, फुलंब्री तालुक्यात १०१० हेक्टर, वैजापूर तालुक्यात ७५ हेक्टर, गंगापूर तालुक्यात ३९५ हेक्टर, सिल्लोड तालुक्यात ३ हजार ०६९ हेक्टर, कन्नड तालुक्यात १०८ हेक्टर, सोयगाव तालुक्यात ९५ हेक्टरवर लागवड झाली आहे.

या खालोखाल जिल्ह्यात मक्याची लागवड झाली असून, आतापर्यंत फुलंब्री तालुक्यात १ हजार १७५ हेक्टर, सिल्लोड तालुक्यात ६४८ हेक्टर, वैजापूर तालुक्यात ९५ हेक्टर, कन्नड तालुक्यात १३९ हेक्टर, सोयगाव तालुक्यात १२५ हेक्टरवर अशी एकूण २ हजार १८२ हेक्टरवर मक्याची पेरणी झाली आहे. बोंडअळीमुळे गेल्या वर्षी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे यंदा कपाशीच्या क्षेत्रात घट होईल, अशी अपेक्षा होती; परंतु यंदाही शेतकऱ्यांचा कल हा कपाशीकडेच असल्याचे दिसून येते. 

यंदा जिल्ह्यात सरासरीच्या ८३.८० मि.मी. पाऊसजिल्ह्यात आजपर्यंत सरासरी ८३.८० मिमी एवढाच पाऊस झाला. या तुलनेत गेल्या वर्षी २५ जूनपर्यंत सरासरी १२८.०२ मिमी एवढा पाऊस झाला होता. यंदा जूनमध्ये आजपर्यंत औरंगाबाद तालुक्यात १३५.८० मिमी., फुलंब्री तालुक्यात १२९.७५ मिमी, पैठण तालुक्यात ६३.७० मिमी, सिल्लोड तालुक्यात ६७.६७ मिमी, सोयगाव तालुक्यात ९०.९९ मिमी, कन्नड तालुक्यात ९१.१४ मिमी, वैजापूर तालुक्यात ६८.५० मिमी, गंगापूर तालुक्यात ५८ मिमी, खुलताबाद तालुक्यात ४८.६६ मिमी एवढा पाऊस झाला आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊस