यंदा सहा लाख हेक्टरवर पेरा

By Admin | Published: May 27, 2017 12:31 AM2017-05-27T00:31:02+5:302017-05-27T00:32:26+5:30

लातूर : मान्सूनपूर्व मशागतीची कामे आटोपून बळीराजा मृग नक्षत्राची वाट पाहू लागला असून, यंदा ६ लाख १० हजार ९१ हेक्टरवर पेरा होण्याची शक्यता आहे.

Sow on six lakh hectares this year | यंदा सहा लाख हेक्टरवर पेरा

यंदा सहा लाख हेक्टरवर पेरा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : मान्सूनपूर्व मशागतीची कामे आटोपून बळीराजा मृग नक्षत्राची वाट पाहू लागला असून, यंदा ६ लाख १० हजार ९१ हेक्टरवर पेरा होण्याची शक्यता आहे. यंदाही शेतकऱ्यांची पसंती सोयाबीनवरच असून, ४ लाख ६ हजार ८४० हेक्टर्सवर ही पेरणी प्रस्तावित आहे. त्याखालोखाल १ लाख १३ हजार ३८० हेक्टरवर तुरीचा पेरा होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.
जिल्ह्यात सर्वसाधारण खरिपाचे क्षेत्र ५ लाख ११ हजार ७८५ हेक्टर्स असून पेरणी मात्र ६ लाख १० हजार ९१ हेक्टरवर प्रस्तावित आहे. खरीप ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख २७ हजार ६५० असले, तरी पेरा मात्र ४५ हजार ५३ हेक्टरवर होण्याची शक्यता आहे. तुरीचे सर्वसाधारण क्षेत्र ८१ हजार १४० हेक्टर असून गतवर्षी १ लाख १७ हजार ७४५ हेक्टरवर तुरीची पेरणी झाली होती. यंदा १ लाख १३ हजार ३८० हेक्टरवर होण्याची शक्यता आहे. गतवर्षीपेक्षा यंदा तुरीचे क्षेत्र थोडे घटण्याची शक्यता आहे. सोयाबीनही गतवर्षीपेक्षा १५०९ हेक्टरने घटत आहे. तुरीच्या आणि सोयाबीनच्या क्षेत्रावर ऊस लागवड झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. गत हंगामात पाऊसकाळ चांगला झाल्यामुळे ऊस लागवड झाली असल्याचेही कृषी विभागाने म्हटले आहे. उडीद पिकाचे ४४ हजार ६३० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून, प्रत्यक्ष पेरा मात्र ११ हजार ८८५ हेक्टरवर होण्याची शक्यता आहे. इतर सूर्यफुल, भुईमूग, साळ, बाजरी, मका, मूग आदी पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र ६६ हजार ५ हेक्टर असून, प्रत्यक्ष पेरा मात्र ३२ हजार ९३३ हेक्टरवर होईल, असे कृषी विकास अधिकारी भीमराव रणदिवे यांनी सांगितले.

Web Title: Sow on six lakh hectares this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.