शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण-मध्य रेल्वेचे सिकंदराबादवर प्रेम, मराठवाड्यावर अन्याय! दिवाळीचा प्रवास ‘वेटिंग’वरच

By संतोष हिरेमठ | Updated: October 14, 2025 12:19 IST

नांदेड, छत्रपती संभाजीनगरसाठी रेल्वे प्रशासनाचा कायम दुजाभाव

छत्रपती संभाजीनगर : दक्षिण-मध्य रेल्वे नेहमीच मराठवाड्यासाठी, त्यातही छत्रपती संभाजीनगरसाठी नव्या रेल्वे देताना दुजाभाव करतेच. पण दिवाळीसाठी काही विशेष रेल्वे सोडण्यातही त्यांची हीच भूमिका कायम आहे. परिणामी, प्रवाशांना दिवाळीत ‘वेटिंग’वरच प्रवास करावा लागणार आहे.

दिवाळीच्या काळात नागपूर, मुंबईसाठी तसेच दक्षिण आणि उत्तर भारतात जाण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमार्गे विशेष रेल्वे चालवावी, अशी मागणी सातत्याने होत असते. मात्र, ही मागणी पूर्ण होत नाही. ही परंपरा यंदाही कायम आहे. मुंबईला ये-जा करणाऱ्या प्रवाशांना दिवाळीच्या काळात ‘वेटिंग’वर तिकीट घ्यावे लागत आहे. दिवाळीनंतर मराठवाड्यातून परत मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांनाही ‘वेटिंग’वर तिकीट घ्यावे लागत आहे. ‘वेटिंग’ची तिकिटे कमी करण्यासाठी व प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष रेल्वे चालवण्याचे अधिकार संबंधित झोनला देण्यात आलेले आहेत. परंतु, मराठवाड्याकडे दुर्लक्ष करून सिकंदराबाद, विजयवाडा, हैदराबाद, गुंटूर आदी विभागातील प्रवाशांची ‘सोय’ करण्यावरच ‘दमरे’ भर देत आहे.

रेल्वेचे आरक्षण ‘फुल्ल’मुंबईला जाणाऱ्या राज्यराणी, जनशताब्दी, तपोवन, नंदीग्राम, देवगिरी, राज्यराणी एक्स्प्रेसचे आगामी १० दिवसांतील आरक्षण ‘वेटिंग’वर गेले आहे. सचखंड एक्स्प्रेसचेही तिकीट मिळणे अवघड झाले आहे.

नागपूरसाठी नियमित नाही, किमान विशेष रेल्वे द्यादिवाळीसाठी शहरातून नागपूरला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. परंतु, छत्रपती संभाजीनगरहून नागपूरसाठी आजघडीला नियमित रेल्वे नाही. त्यामुळे ट्रॅव्हल्सशिवाय पर्याय नाही. त्यासाठी अव्वाच्या सव्वा भाडे मोजावे लागते. किमान नागपूरसाठी तरी विशेष रेल्वे सोडण्याची मागणी होत आहे.

कुठे सोडल्या विशेष रेल्वे?नांदेड - निझामुद्दीन, परभणी - जालना, मुंबई - करीमनगर, नांदेड - अनकापल्ली, तिरूपती - साईनगर शिर्डी, जालना - छपरा, जालना - तीरुचानुर आदी विशेष रेल्वे सोडण्यात आल्या, अशी माहिती ‘दमरे’च्या नांदेड विभागातर्फे देण्यात आली.

ट्रॅव्हल्ससोबत साटेलोटेप्रवाशांची मागणी असणाऱ्या शहरांसाठी रेल्वे सोडण्याकडे दुर्लक्ष करून ट्रॅव्हल्सवाल्यांचा फायदा केला जात आहे. विशेष रेल्वे सोडण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नांदेड, छत्रपती संभाजीनगर भारतात आहे की नाही? असा प्रश्न पडत आहे.- अरुण मेघराज, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघ

या रेल्वेंची मागणी- छत्रपती संभाजीनगरहून मुंबई, अमरावती-नागपूर, बंगळुरू-म्हैसूर, सुरत, अहमदाबाद, पुणे, नांदेड-मडगाव (नाशिक-पनवेलमार्गे) आदींसाठी विशेष रेल्वेंची मागणी होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : South-Central Railway favors Secunderabad, neglects Marathwada; Diwali travel on waiting list.

Web Summary : South-Central Railway allegedly favors Secunderabad over Marathwada, especially Aurangabad, during Diwali. Despite demand for special trains to Mumbai and Nagpur, passengers face long waiting lists. Critics accuse the railway of prioritizing other regions and neglecting Marathwada's needs, benefiting private travel operators.
टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीMarathwadaमराठवाडाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरNandedनांदेड