शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांकडून नावे मागवून ‘समृद्धी’च्या बछड्यांचा लवकरच नामकरण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 20:28 IST

जाहीर प्रगटनाद्वारे व्हॉटस्अ‍ॅपवर नावे सुचविण्याचे आवाहन केले जाणार आहे. 

ठळक मुद्देदोन वर्षांनंतर प्राणिसंग्रहालयात पाळणा हलला होता. समृद्धी या वाघिणीने २७ एप्रिलला रात्री चार बछड्यांना जन्म दिला.

औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानातील ‘समृद्धी’ या वाघिणीने अलीकडेच चार बछड्यांना जन्म दिला आहे. चारही बछड्यांचे वजन हळूहळू वाढत आहे. सर्वांची प्रकृती अत्यंत ठणठणीत असून, सर्व बछडे दिवसभर आईसोबत दंगामस्ती करीत असतात. त्यांचा नामकरण सोहळा लवकरच पार पडणार असून, त्यासाठी नागरिकांकडून नावे मागविली जाणार आहेत. 

सिद्धार्थमधील प्राणिसंग्रहालयात ८ वाघ होते. त्यातील समृद्धी या वाघिणीने २७ एप्रिलला रात्री चार बछड्यांना जन्म दिला. दोन वर्षांनंतर प्राणिसंग्रहालयात पाळणा हलला होता. त्यामुळे पेढे वाटून आनंदोत्सवही साजरा करण्यात आला होता. चारही बछड्यांची प्रकृती दिवसेंंदिवस सुधारत असून, सध्या त्यांचे वजन दोन किलो एवढे झाले आहे. बछड्यांचे नामकरण करण्याचा उपक्रम महापालिकेने काही वर्षांपूर्वी सुरू केला होता. त्यानुसार आता या चार बछड्यांना नावे दिली जाणार आहेत. नागरिकांकडून त्यासाठी नावे मागविली जातील, असे महापौरांनी सांगितले. जाहीर प्रगटनाद्वारे व्हॉटस्अ‍ॅपवर नावे सुचविण्याचे आवाहन केले जाणार आहे. 

टॅग्स :leopardबिबट्याAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबाद