शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

पोलिस, निवृत्त जवानाच्या मुलांनी बनवली चोरांची टोळी; चोरीच्या सोन्यावर घेत गोल्ड लोन

By सुमित डोळे | Updated: November 21, 2023 17:23 IST

सिनेस्टाईल चोर सिडको पोलिसांकडून अटकेत, फायनान्स कंपनीत चोरीचे सोने ठेवून घ्यायचे कर्ज

छत्रपती संभाजीनगर : एके काळी ज्याने मोबाईल चोरला, त्याच्याशीच पुण्याच्या नामांकित महाविद्यालयातून एमबीए उत्तीर्ण तरुणाची मैत्री झाली. व्यसनातून त्यांच्यातली मैत्री ‘बहरत’ गेली व दोघांनी चोरांची टोळी तयार करून सोनसाखळी, मोबाईल चोरी सुरू केली. सिडको पोलिसांनी सलग ४८ तास तपास करून त्यांना अटक केली. प्रशांत उर्फ रॉ जालिंदर आहेर (१९, रा. श्रीकृष्णनगर) व आशिष उर्फ जॉर्डन गायकवाड (रा. एन-१२) अशी आरोपींची नावे असून तिसरा चोर अल्पवयीन आहे.

शनिवारी सकाळी एन-५ मध्ये सुमन कुडमेहता या घरासमोर रांगोळी काढत असताना मोपेडस्वार चोरांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले. सिडकोच्या पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांच्या सूचनेवरुन सहायक निरीक्षक श्रध्दा वायदंडे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के, पंकज मोरे यांनी वेगाने तपास सुरू केला. घटनास्थळापासून चोर फरशी मैदानाच्या दिशेने जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. गुप्त बातमीदाराने त्यातील अल्पवयीन मुलाला ओळखले. तो व रॉ यांची टोळी नेहमी फरशी मैदानात नशा करत बसत असल्याचे सांगितले. त्यावरून अंमलदार सुभाष शेवाळे, विजयानंद गवळी, लालखाँ पठाण, प्रदीप दंडवते, विशाल सोनवणे, संदीप जाधव, सहदेव साबळे, अनिल सोमवंशी यांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत रॉ ने आशिषसोबत मिळून मागील १५ दिवसांमध्ये चिश्तिया चौकातून दुचाकी, एन-८, एन-५ मध्ये सोनसाखळी व शहरातून ६ मोबाईल हिसकावल्याची कबुली दिली.

मोबाईल चोरला अन् मैत्री झालीरॉ चे वडील जिल्हा पोलिस दलात हेडकॉन्स्टेबल आहेत तर आशिषचे वडिल निवृत्त लष्कर जवान आहेत. आशिष पुण्याच्या नामांकित महाविद्यालयातून एमबीए उत्तीर्ण आहे. रॉ वर यापूर्वी हत्येचा प्रयत्न, चोऱ्यांचे गुन्हे दाखल आहेत. २०२१ मध्ये रॉ ने आशिषचा मोबाईल चोरला होता. रॉ ने मोबाईल चोरून आशिषला कॉल करून माेबाईल सापडल्याचे सांगून १ हजार रुपयांची मागणी करून परत दिला. त्याच दरम्यान आशिषची राॅ सोबत मैत्री फुलली. पुढे तो रॉच्या टोळीशीही जाेडला गेला.

चोरीच्या सोन्यावर गोल्ड लोनशहरात मोपेडवर फिरून रॉचे अन्य मित्र मोबाईल चोरतात. ते घेऊन विकण्याची जबाबदारी अल्पवयीन चोर पार पाडतो. रात्रभर नशा करून पहाटेपर्यंत चोरीसाठी सावज शोधत फिरतात. आशिष अस्खलीत इंग्रजी बोलतो. त्याला बँक, फायनान्सचे सर्व ज्ञान आहे. चाेरीचे सोने फायनान्स कंपनीत ठेवून कर्ज घेण्याची शक्कल त्यानेच त्यांना सांगितली. त्यानंतर त्यांनी सर्व सोने बड्या गोल्ड लोन फायनान्स कंपनीत ठेवायला लागले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद