बीड : तालुक्यातील पारगाव जप्ती येथे लग्नाच्या स्टेजवरून पडल्याने एका मुलाचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी सकाळी घडली.अजय वैजीनाथ पडेकर (वय १५, रा. हिरापूर, ता. गेवराई) असे मयताचे नाव आहे. हिरापूरलगत असलेल्या पारगाव जप्ती येथे गुरूवारी विवाह समारंभ होता. वधुवरांना बसण्यासाठी मंडप उभारणीचे काम सुरू होते. स्टेज उभारताना अजय पडेकर याचा तोल गेला. त्यानंतर तो खाली पडला. त्याच्या हाताला, डोक्याला मार लागला. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत ग्रामीण ठाण्यात घटनेची नोंद झालेली नव्हती. (प्रतिनिधी)
स्टेजवरून पडून मुलाचा मृत्यू
By admin | Updated: May 4, 2017 23:21 IST