शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

सौरऊर्जेवर चालणारे ‘नालेसफाई यंत्र’

By admin | Updated: July 20, 2016 00:29 IST

औरंगाबाद : पावसाळ्यात पहिला पाऊस होताच, वेगवेगळ्या प्रकारचा कचरा अडकून शहरातील नदी व नाले चोकअप होतात. यातूनच पीईएस पॉलिटेक्निकच्या चार विद्यार्थ्यांना एक कल्पना सुचली.

औरंगाबाद : पावसाळ्यात पहिला पाऊस होताच, वेगवेगळ्या प्रकारचा कचरा अडकून शहरातील नदी व नाले चोकअप होतात. यातूनच पीईएस पॉलिटेक्निकच्या चार विद्यार्थ्यांना एक कल्पना सुचली. त्यातूनच त्यांनी आॅटोमॅटिक नालेसफाई यंत्र तयार केले. हे यंत्र विजेवर किंवा सोलार ऊर्जेवरही चालू शकते. नगरपालिका, महानगरपालिका व जिल्हा परिषद या संस्थांना हे नालेसफाई यंत्र उपयोगी पडणारे आहे. शेख यासीर मोहम्मद फरहान, मोहम्मद झोएब लईक अहमद, मोहम्मद अब्दुल मोहीमब, कादरी मोहम्मद उनझर, मोहम्मद अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे चारही जण पॉलिटेक्निकच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहेत. शहरातील नाल्यांच्या कठड्यावर उभे राहून, निरीक्षण केले असता पॉलिथिन, प्लास्टिक, पानकापड इत्यादी कचऱ्याने तुडुंब भरलेले दिसतात. या नाल्यांच्या निरीक्षणावरून या विद्यार्थ्यांच्या मनात ही कल्पना आली. ती कल्पना त्यांनी आपल्या शिक्षकांना सांगितली. प्राचार्य टी.ए. कदम व विभागप्रमुख आशिष गायकवाड यांनी ती कल्पना सत्यात उतरविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. हे नालेसफाई यंत्र विद्यार्थ्यांनी अत्यंत माफक किमतीत निर्माण केले आहे. हे यंत्र चालविण्यासाठी त्यास सोलार पॅनल बसविण्यात आले आहे. तसेच त्याला इलेक्ट्रॉनिक मोटारही फीट केलेली आहे. हे यंत्र वीज व सौरऊर्जेवरही चालू शकते. यंत्रास नाल्यावर सिवरेजच्या चेंबरमध्ये व नदीच्या प्रवाहात बसविल्यास वाहून येणारे पॉलिथिन, प्लास्टिक आदी कचरा हे यंत्र सेन्सरद्वारे डिटेक्ट करते. यंत्रावर असलेल्या सेन्सरमुळे ते सुरूहोते. अडकलेला कचरा चेन डायव्ह लिफटरच्या साह्याने बाहेर फेकला जातो. नालेसफाई, सिवरेज चोकअपच्या समस्यांसाठी हे यंत्र खूपच उपयुक्त आहे.