शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सोशल मीडियाची खंबीर साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 14:05 IST

सोशल मीडियाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मदतीस इच्छुक असणारे तात्काळ प्रतिसाद देतात.

ठळक मुद्देयुवकांनी सोशल मीडियातून केले मदतीचे आवाहनग्रुपमधील सर्वांना आणि परिचितांना सोशल मीडियातून दिला संदेश

औरंगाबाद : कोल्हापूर-सांगलीत उद्भवलेल्या भयंकर पूरपरिस्थितीत अडकलेल्या हजारो नागरिकांना मदतीचा ओघ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यासाठी युवकांनी पुढाकार घेतल्याचे दिसत असून, त्यांना मदत गोळा करून देण्यात आणि ती योग्य ठिकाणी पोहोचविण्यासाठी सोशल मीडियाची खंबीर साथ लाभत आहे. शहरातील ‘आव्हान युथ फाऊंडेशन’या युवकांच्या ग्रुपने या माध्यमातून भरघोस मदत रवाना केली आहे.

सांगली जिल्ह्यात ग्रामीण भागात मदतकार्य करणाऱ्या राजू केंद्रेला पूरग्रस्तांसाठी काही अत्यावश्यक मदत हवी होती. त्याने सोशल मीडियातून मदतीचे आवाहन केले. हा संदेश शहरातील ‘आव्हान युथ फाऊंडेशन’ या सामाजिक कार्य करणाऱ्या युवकांच्या ग्रुपला मिळाला. ग्रुपमधील युवक छोटे-मोठे काम करत शिक्षण घेतात आणि काही सामाजिक उपक्रम राबवितात. यातील ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करणाऱ्या सुनील नायरने आवश्यक मदतीची नोंद करून एक यादी बनवून संदेश तयार केला. हा संदेश ग्रुपमधील सर्वांना आणि परिचितांना सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवून मदतीचे आवाहन केले. लागलीच त्यांना शहरातून मदतीसाठी संदेश येऊ लागले. कोणी सामान आणून दिले तर कोणी मदतीसाठी रोख रक्कम पाठविली. आलेल्या सामानाचे वर्गीकरण करून आवश्यक साहित्याची एका कुटुंबासाठी कीट तयार करण्यात आली. जवळपास ४०० कुटुंबांसाठी अशा कीट तयार करण्यात आल्या आहेत.  कोल्हापूर जिल्ह्यातील आरे या खेड्यात मदतकार्य करणाऱ्या सचिन गवळी याने येथील ३०० कुटुंबांसाठी कपड्यांची मदत पाठविण्याचे आवाहन सोशल मीडियातून केले. याला प्रतिसाद देत ‘आव्हान युथ फाऊंडेशन’ने शहरातील दानशूरांना सोशल मीडियातून संपर्क  केला. दोन दिवसांमध्ये त्यांच्याकडे महिला, पुरुष आणि लहान मुलांसाठी आवश्यक अंतर्वस्त्रे आणि इतर कपडे मोठ्या प्रमाणात जमा झाली. कोल्हापूर आणि सांगलीला मदत शहरातून पाठवताना होणारा खर्चसुद्धा मोठा आहे, यासाठी ट्रॅव्हल व्यावसायिक सुनील दांडगे हे मोफत व्यवस्था करीत आहेत.

योग्य ठिकाणी मदत पोहोचणे आवश्यक मदतकार्यात समन्वयक असलेला सुनील नायर सांगतो, मदत करण्यासाठी खूप जण इच्छुक असतात. मात्र, ती कशी आणि नेमकी कुठे द्यायची याची त्यांना माहिती नसते. सोशल मीडियाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मदतीस इच्छुक असणारे तात्काळ प्रतिसाद देतात. यात युवकांची संख्या जास्त आहे. संदेश पाहून सिंगापूर आणि देशातील इतर राज्यांतील काही मित्रांनीसुद्धा आर्थिक मदत पाठविली. विशेष म्हणजे दानशूरांना त्यांची मदत कुठे आणि कोणाला पोहोचली याची माहिती, फोटो आम्ही पाठवत असतो. यामुळे त्यांनासुद्धा मदत योग्य ठिकाणी पोहोचल्याचे समाधान मिळते.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाfloodपूरsocial workerसमाजसेवक