शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

‘... तर मीच येथून निघून जातो...’; भाजप नगरसेवकांत जुंपल्याने सावेंचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 18:55 IST

‘तुम्ही शांत बसणार नसाल, तर मीच येथून निघून जातो...’ राज्यमंत्री सावे संतप्त

औरंगाबाद : पूर्व मतदारसंघातील नाल्यांचे आणि पाणीपुरवठ्याचे प्रश्न व इतर नागरी समस्यांचे निराकरण व्हावे, यासाठी उद्योग राज्यमंत्री अतुल सावे हे गुरुवारी महापालिकेत आले असता त्यांच्यासमोरच भाजप नगरसेवकांमध्ये श्रेयवादाची लढाई झाली. तुम्ही शांत बसणार नसाल तर मीच येथून निघून जातो, असा संताप व्यक्त करुन सावे यांनी नगरसेवकांना झापले. मनपा आयुक्त डॉ.निपुण विनायक यांच्या दालनातच हा प्रकार घडला. 

सावे मनपात येण्यापूर्वी पाणी प्रश्न आणि नालेसफाईच्या मुद्यावरून गटनेते प्रमोद राठोड, नगरसेवक  दिलीप थोरात, मनीषा मुंडे आदींनी आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. पूर्व मतदारसंघातील समस्या मांडण्यासाठी सावे यांचे मनपात येणे आणि नगरसेवकांनी ठिय्या देणे या घटना सोबत झाल्या. पाणीपुरवठ्याप्रकरणी विशेष सभा घेण्याबाबत महापौर नंदकुमार घोडेले यांनी भाजप नगरसेवकांना आश्वासित केले होते. परंतु ती सभा न झाल्यामुळे भाजप नगरसेवक सत्तेत असतानाही त्यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या दिला. राज्यमंत्री मनपात आल्यानंतर नगरसेवकांसह ते आयुक्तांच्या दालनात गेले. तेथील बैठकीत मतदारसंघातील नाल्याच्या संरक्षक भिंतीचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. आयुक्तांशी चर्चा सुरू असतानाच नगरसेवकांमध्ये वाद वाढल्याने ते संतापले. प्रोटोकॉल मोडून येथे समस्या मांडण्यासाठी आलो आहे, मुद्दे सोडून इतरत्र चर्चा करून नका म्हणत ते नगरसेवकांवर मोठ्याने ओरडले.  त्यांचा आवाज आयुक्तांच्या दालनाबाहेर आला. महापौरांसह औरंगाबाद पूर्व मतदारसंघातील शिवसेना-भाजप नगरसेवकांची यावेळी उपस्थिती होती.

नगरसेवकांमध्ये बेबनाव आयुक्तांच्या दालनातच भाजप नगरसेवकांमधील बेबनाव समोर आला. समान पाणी देण्यासाठी आमच्या भागाला एक दिवस गॅप द्या, अशी भूमिका थोरात यांनी मांडली. त्यावर राठोड यांनी हा प्रशासनाचा विषय आहे. त्यामुळे तुम्ही कशाला मेहरबान होता. माझ्या भागाचा विषय मला मांडू द्या, असे थोरात यांना सांगितले. त्यामुळे थोरात संतापले. यातूनच वाद झाला. या वादात सुरेंद्र कुलकर्णी यांनीही उडी घेतली.

दीड दिवसात समान पाणीपुरवठ्याचा दावाशहरात पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे. यासंदर्भात नगरसेवकांसह नागरिकांनी माझ्याकडे तक्रारी केल्या. त्यामुळे आयुक्तांसोबत आज चर्चा केली. शहर अभियंता एस. डी. पानझडे यांच्यामार्फत शहरातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेण्यात येणार आहे. दीड दिवसात समान पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचे सावे यांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केले.

टॅग्स :BJPभाजपाAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादAtul Saveअतुल सावे