शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला भरारी, विज्ञान प्रदर्शनात पर्यावरणपूरक साहित्य, स्मार्ट कारचा बोलबाला

By योगेश पायघन | Updated: September 8, 2022 16:49 IST

तालुकास्तरीय प्रदर्शनातून निवडलेल्या गेलेल्या २८ माध्यमिक तर ४० प्राथमिक शाळांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदवला.

औरंगाबाद : पर्यावरणपूरक साहित्य निर्मिती, हवामानातील बदल आणि आरोग्य, स्वच्छतेसंदर्भात विद्यार्थीनिर्मित कल्पक साहित्य जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात बुधवारी पाहायला मिळाले. द जैन इंटरनॅशनल स्कूलमध्ये दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या स्मार्ट कार, डस्टबिनसह विविध प्रकल्पांनी लक्ष वेधले.

माध्यमिक शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांच्या हस्ते जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. तालुकास्तरीय प्रदर्शनातून निवडलेल्या गेलेल्या २८ माध्यमिक तर ४० प्राथमिक शाळांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदवला. गुरुवारी सकाळी ११ वाजता विज्ञान मेळावा आणि नाट्यउत्सव, वक्तृत्व स्पर्धा होईल. यावेळी औरंगाबादच्या गटशिक्षणाधिकारी दीपाली थावरे, विस्तार अधिकारी रमेश ठाकूर, जे. व्ही. चौरे, मनीषा वाशिंबे, द जैन इंटरनॅशनल स्कूलच्या शिखा श्रीवास्तव, प्रवीण सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

गाडीवाटच्या विद्यार्थ्यांनी वेधले लक्षगाडीवाट येथील जि.प. आदर्श उच्च प्राथमिक शाळेच्या ओंकार कोळगे, मोहसीन नसिर शेख, शुभम कोळगे, गणेश सातपुते या विद्यार्थ्यांनी स्मार्ट कारचे सादरीकरण केले. ड्रायव्हरशिवाय ही कार धावू शकते. मार्गदर्शक शिक्षक दादासाहेब नवपुते म्हणाले, यापूर्वी याच शाळेच्या लाइन फाॅलोअर रोबोट या प्रकल्पाने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवला होता.

स्मार्ट डस्टबिनएसबीईएस शाळेच्या प्रथमेश काळे या विद्यार्थ्याने अल्ट्रासॉनिक सेन्सर लावून कचरा पेटी उघडणे. त्याचे वर्गीकरण करता येणे शक्य असल्याचे सांगितले. याशिवाय गोंदेगावच्या एस. बी. शाळेच्या विद्यार्थ्यांनी जागतिक तापमानवाढ आणि त्याचे परिणाम दर्शवणाऱ्या प्रकल्पाचे सादरीकरण केले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादscienceविज्ञानEducationशिक्षण