शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सहा टप्पे, ९२ कोटींचा निधी; तब्बल ४५ वर्षांनंतर होणार जायकवाडी धरणाची दुरुस्ती

By बापू सोळुंके | Updated: July 13, 2023 19:19 IST

जागतिक बँकेने धरणाच्या दुरुस्तीसाठी ९२ कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र, दोन वर्षांनंतरही निधी पडून असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने १ मार्च रोजी प्रकाशित केले होते. तेव्हापासून ड्रीप योजनेच्या फायलींना वेग आला.

छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारच्या ड्रीप (डॅम रिहॅबिटेशन ॲण्ड इम्प्रूव्हमेंट प्रोग्रॅम) योजनेअंतर्गत पैठण येथील जायकवाडी धरणाची सहा पॅकेजमध्ये ९२ कोटी रुपये खर्च करून दुरुस्ती केली जात आहे. या कामाच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली असल्याची माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे (कडा) मुख्य अभियंता जयंत गवळी यांनी दिली.

पैठण येथील जायकवाडी धरणाची उभारणी होऊन सुमारे ४५ वर्षांपेक्षा अधिक कालावधी होत आहे. तेव्हापासून आतापर्यंत धरणाची विशेष अशी दुरुस्ती करण्यात आलेली नाही. ही बाब लक्षात घेऊन लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने ड्रीप योजनेअंतर्गत जायकवाडी धरणाची दुरुस्ती व्हावी, यासाठी प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव मंजूर होऊन जागतिक बँकेने धरणाच्या दुरुस्तीसाठी ९२ कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र, दोन वर्षांनंतरही निधी पडून असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने १ मार्च रोजी प्रकाशित केले होते. तेव्हापासून ड्रीप योजनेच्या फायलींना वेग आला. सहा पॅकेजमध्ये धरण दुरुस्ती करण्याचा निर्णय झाला. याविषयी मुख्य अभियंता जयंत गवळी म्हणाले की, जायकवाडी प्रकल्पाच्या दुरुस्तीसह विविध कामांसाठी केंद्र सरकाने ड्रीप योजनेअंतर्गत ९२ कोटी रुपये मंजूर केले आहेत. सहा पॅकेजमध्ये ही दुरुस्ती होणार आहे. या कामाच्या निविदा नुकत्याच ठेकेदारांकडून प्राप्त झाल्या. 

असे आहेत सहा टप्पे :

पॅकेज क्र. १ मध्ये मुख्य धरण दुरुस्ती, यासाठी ६२ कोटी रुपयांचा निधी आहे पॅकेज क्र. २ मध्ये धरणाला जोडणारा रस्ता, धरणाच्या भिंतीवरील १० किलोमीटरचा रस्ता तयार करणे, जायकवाडी येथील विश्रामगृहाची दुरुस्ती इ. कामे केली जातील. यासाठी १८ कोटी रुपये खर्च होतील. या कामाच्या निविदांची तांत्रिक तपासणी सुरू आहे.पॅकेज क्र. ३ मध्ये धरणातील उपकरणांची दुरुस्ती होईल. हे काम नाशिक येथील मेरी संस्थेच्या वतीने करण्यात येईल. या कामावर ४ कोटी रुपयांचा खर्च होईल. पॅकेज क्र. ५ अंतर्गत धरणाची फाटकांची दुरुस्ती होईल. यांत्रिकी विभागामार्फत सुमारे ३ कोटी रुपयांचे काम केले जाईल. या कामाच्या निविदा काढण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पॅकेज क्र. ६ मध्ये धरणाशी संबंधित २ कोटी रुपयांची इलेक्ट्रिकलची कामे होतील.

जायकवाडीवर सीसीटीव्हीची नजरपॅकेज क्र. ४ अंतर्गत संपूर्ण जायकवाडी धरणाच्या सुरक्षेला शासनाने प्राधान्य दिले आहे. धरणाच्या भिंतीसह मुख्य रस्ता, प्रवेशद्वार, यांत्रिकी विभाग आणि जलविद्युत प्रकल्प इ. ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आणि देखभाल, दुरुस्तीसाठी ३ कोटी रुपये लागतील.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणRainपाऊसAurangabadऔरंगाबाद