शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद महापालिकेवर सहा महिने प्रशासक ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 18:56 IST

सहा महिने शासन प्रशासक म्हणून मनपा आयुक्तांना ठेवणार असल्याचेही बोलले जात आहे.

ठळक मुद्दे निवडणूक प्रक्रियेला होतोय बिलंबनिवडणूक पुढे ढकलण्याची चर्चा

औैरंगाबाद : महापालिकेतील विद्यमान नगरसेवकांचा कालावधी २० एप्रिल रोजी संपणार आहे. त्यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक घ्यावी लागणार आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयोगाकडून वॉर्ड आरक्षणासंदर्भात सोडतही घेण्यात येते. यंदा जानेवारी महिना संपत आला तरी आयोगाकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे महापालिका निवडणूक सहा महिन्यांसाठी लांबणार असल्याची चर्चा सुरू आहे. सहा महिने शासन प्रशासक म्हणून मनपा आयुक्तांना ठेवणार असल्याचेही बोलले जात आहे.

१९८८ पासून आजपर्यंत औरंगाबाद महापालिकेत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. प्रत्येक निवडणुकीनंतर शिवसेना-भाजप युती होते. त्यानंतर सत्तेमधील महत्त्वाची पदे आपसात वाटून घेण्यात येतात. आता युती तुटल्याने शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता स्थापन करावी लागेल. यंदाच्या मनपा निवडणुकीतही कोणत्याही पक्षाला बहुमताचा आकडा गाठता येणार नाही. ५६ या जादुई आकड्यापर्यंत जाण्यासाठी सेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीची मदत घ्यावीच लागणार आहे. अगोदर महापालिका निवडणूक प्रभाग पद्धतीने घेण्याचे निश्चित झाले होते. राज्यातील महाआघाडी सरकारने प्रभाग पद्धतीचा निर्णय रद्द करून वॉर्ड पद्धतीनेच निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. या प्रक्रियेलाही आयोगाकडून प्रचंड विलंब होत आहे. यापूर्वी मनपाच्या निवडणुकांमध्ये आयोगाकडून डिसेंबरअखेर किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वॉर्ड आरक्षणाची सोडत घेण्यात आली. यंदा वॉर्ड रचनेचा आराखडा सादर करून तीन आठवडे उलटले तरी आयोगाकडून कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. जानेवारी महिना संपत आला तरी परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ९ आणि १० जानेवारी रोजी औरंगाबादेत आले असताना त्यांनी काही विश्वासातील स्थानिक मान्यवरांसोबत चर्चा केल्याचे कळते. मनपा निवडणुकीसंदर्भात बराच वेळ त्यांनी चर्चा केली, मनपावर सहा महिने प्रशासक ठेवून विकास कामे करूनच मतदारांसमोर जावे अशी चर्चा यावेळी झाल्याचीही चर्चा  आहे.

महापालिका बरखास्त करणार?महापालिकेतील राजकीय मंडळींची विविध विकास कामांत होणारी लुडबूड लक्षात घेऊन शासन एप्रिल २०२० नंतर लगेच महापालिका बरखास्त करून प्रशासक नेमणार आहे. विद्यमान आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनाच प्रशासक म्हणून ठेवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

ही तर निव्वळ चर्चामागील काही दिवसांपासून शहरात अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे. अधिकृतपणे अशा पद्धतीने कोणीच दुजोरा दिलेला नाही. महापालिकेचा कार्यकाल संपताच प्रशासक नेमण्यात येणार असल्याचेही कानावर येत आहे.    - नंदकुमार घोडेले, महापौर

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाState Governmentराज्य सरकारShiv SenaशिवसेनाBJPभाजपा