शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, सौरपंपाला ‘प्रेशर’ येईना अन् थेट वीजपुरवठाही मिळेना !

By साहेबराव हिवराळे | Updated: December 1, 2023 16:41 IST

उन्हाचा पारा चांगला असेल तरच कृषिपंपही व्यवस्थित चालतो.

छत्रपती संभाजीनगर : सौर कृषिपंप योजनेंतर्गत जिल्ह्यात केवळ १४,७४२ शेतकऱ्यांच्याच मागणीची पूर्तता झाली असून, ते वापरताना शेतकऱ्यांना कमी व्होल्टेज मिळत असल्याने पाणी भरण्यासाठी अडचणी येतात.

काय आहे सौर कृषिपंप योजना?महाकृषी ऊर्जा अभियान पीएम-कुसुम योजना आणली आहे. पीएम-कुसुम सौरपंपासाठी शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर कृषिपंप दिला जातो. नापिकीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी जमिनीवर कृषी उत्पादन घ्या आणि शेतात सोने पिकवा. असे केल्याने पीएम कुसुम पंप घेणाऱ्या शेतकऱ्यांचा फायदाच होणार आहे. वीज नसली तरी दुर्गम भागात, कृषी उत्पादकांना पर्वणीच आहे.

सौर कृषिपंपांचे वाटप केवळ १४,७४२ जणांचीच पूर्तता झाली असून, ऑनलाइन पोर्टलवर अर्ज सादर केल्यानंतर पडताळणी, पाहणी, मंजुरी आणि प्रत्यक्ष सौरपंप बसविणे अशा विविध प्रक्रियांतून जावे लागते.

प्रेशर येईना अन् वीजही मिळेना सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे कृषी पंपाला प्रेशर येत नाही. पंपही व्यवस्थित चालत नाहीत. उन्हाचा पारा चांगला असेल तरच कृषिपंपही व्यवस्थित चालतो.

सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी ९० टक्के अनुदानावर सौरपंप देण्यात येत आहेत; त्यामुळे वीज गुल झाल्याने घुसमट होणार नाही आणि केव्हाही ओसाड माळरानावर फुलविली शेती तरी कुटुंब समाधानी आहे.- कारभारी गायके

पाणी भरण्यासाठी ओकेवीजपुरवठा केव्हाही खंडित होतो. तो पूर्ववत होईपर्यंत नागरिकांना उभे पीक जाताना पाहून काळजाचा थरकाप उडतो. सौरपंप ही चांगली संकल्पना आहे.- दिलीप हिवराळे

ढगाळ वातावरण असेल तरच त्रासढगाळ वातावरण असेल तर सौरपंप हा कमी क्षमतेने व अल्पकाळ चालतो; परंतु वीजपुरवठ्याची प्रतीक्षा करण्याची वेळ शेतकऱ्यावर येत नाही. यामुळे पिकांचेही नुकसान टळते. पीक घेण्यासाठी विहिरीत पाणी असले तरी वीजच नसेल तर काय फायदा?- बाबूलाल फुलवाळी

अडचण काय?सौरऊर्जा पंपाला जर स्टोअरेज क्षमता वाढविण्यासाठी ठरवून दिलेल्या काही यंत्रणा, उपाययोजनाचा फायदा घेतला तर सौरपंप हा व्यवस्थित चालू शकतो. तुम्ही कोणता सौरपंप घेतला यावरही ते अवलंबून आहे. अधिक माहितीसाठी तांत्रिक विभागाशी संपर्क साधून आपण अडचणी दूर करू शकता.- महाऊर्जा अधिकारी

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद