शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

साहेब, अंगावरचे कपडे घ्या, पण शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा; प्रहारचे अर्धनग्न आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 12:19 IST

फुलंब्रीत तहसीलदारांच्या दालनात प्रहारच्या कार्यकर्त्यांचे अर्धनग्न आंदोलन

फुलंब्री : माजी आमदार बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनात फुलंब्री तालुका प्रहार संघटनेच्या वतीने गुरुवारी दुपारी एक वाजता तहसीलदारांच्या दालनात अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. साहेब, अंगावरचे कपडेही घ्या, पण शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, अशा घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या. तसेच तहसीलदार नसल्याने त्यांच्या खुर्चीवर साडी-चोळी ठेवून सरकारचा निषेध नोंदवला.

महायुतीने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. पण, ते पूर्ण केले नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार संघटनेचे नेते आ. बच्चू कडू यांनी अमरावतीतील मोझरी येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. सरकार या आंदोलनाची दखल घेत नसल्याने त्यांच्या समर्थनात फुलंब्री येथील प्रहार संघटना आक्रमक झाली. स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात तहसीलदारांच्या दालनात आंदोलन केले. साहेब, आता अंगावरचे कपडेही घ्या, पण शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, अशा घोषणा देत अक्षरश: कपडे काढून टेबलवर ठेवले. योवळी सरकारला साडी-चोळीची भेट देऊन निषेध व्यक्त केला.

तहसीलदार नसल्याने नायब तहसीलदार नरेंद्र उखळकर यांच्याकडे निवेदन देण्यात आले. सरकारने बच्चू कडू यांच्या आंदोलनाची दखल न घेतल्यास येणाऱ्या काळात छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा प्रहार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. या आंदोलनात प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदाम गायकवाड, कृष्णा गाडेकर, रावसाहेब खिल्लारे, राहुल काकडे, गणेश सुरभय्यै, भारत राऊतराय, आकाश मोरे, अमोल कोलते, जीवन गायकवाड, आदी कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याBacchu Kaduबच्चू कडूagitationआंदोलन