शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

"सिल्लोडचे पाकिस्तान होतंय"; रावसाहेब दानवेंच्या आरोपांवर सत्तारांचा पलटवार,"मी जोपर्यंत..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 12:11 IST

सिल्लोडला बदनाम करू नका, अब्दुल सत्तार यांचा दानवे यांना इशारा

सिल्लोड : मी जोपर्यंत दानवेंसोबत होतो, तोपर्यंत त्यांच्यासाठी चांगला होतो आणि आज वाईट झालो आहे का? आज मला दानवे, औरंगजेबची उपाधी देताय. मला किती बदनाम करायचं ते करा; मात्र माझ्या सिल्लोड तालुक्याला बदनाम करू नका, असा इशारा अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना दिला आहे.

अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार आणि माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंमध्ये लोकसभेच्या निकालानंतर नवा वाद पेटल्याचं चित्र आहे. माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी दोन दिवसांपूर्वी एका वृत्त वाहिनीला मुलाखत देताना मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर, एमआयडीसी, शासकीय कार्यालये गावाबाहेर नेण्याच्या नावाखाली नगर परिषदेचा उपयोग करून लोकांच्या जमिनी हडप केल्या जात आहेत. लोकांना दुकान, घरासाठी बांधकाम परवाने मिळत नाहीत. सिल्लोड एक दिवस पाकिस्तान होणार आहे, असा गंभीर आरोप केला होता. त्यावर उत्तर देताना मंत्री सत्तार म्हणाले, राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा, राजकारणाचा उपयोग हा सर्वसामान्य, गोरगरीब, शेतकरी, शेतमजुरांसाठी केला तर लोकं सोबत राहतात. नाही तर लोक मतदानातून आपली जागा दाखवतात. असेच लोकांनी रावसाहेब दानवेंना त्यांची जागा दाखवली, असे प्रतिउत्तर सत्तार यांनी दानवे यांना दिले. 

जसे कर्म, तसे फळ मिळालेमी त्यांना पाडलेच नाही, जनतेने त्यांना पाडले आहे. ज्या झाडाला फळं जास्त लागतात, तिथे जास्त दगडं मारली जातात. मी तालुक्याच्या विकासावर काम करतो. ‘जो जैसे कर्म करेंगा वैसे फल देगा भगवान ये है गीता का ज्ञान’, असेही सत्तार म्हणाले.

काय म्हणाले होते रावसाहेब दानवेएकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर भाजप नेते माजी खासदार रावसाहेब दानवेंनी गंभीर आरोप केले आहेत. सिल्लोडचा पाकिस्तान होत चाललाय अशा शब्दात रावसाहेब दानवेंनी अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल केला. 'एबीपी माझा' वाहिनीवरील एका कार्यक्रमात दानवेंनी सत्तारांविरोधातील खदखद बोलून दाखवली. सत्तारांनी सिल्लोडमधल्या जमिनी हडपायला घेतल्याचा आरोपही दानवेंनी केल्याने खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादraosaheb danveरावसाहेब दानवेAbdul Sattarअब्दुल सत्तार