शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कामगार नाक्यावर सन्नाटा, कडक उन्हामुळे आले नाहीत की निवडणुकीच्या कामावर रोजगार?

By साहेबराव हिवराळे | Updated: May 2, 2024 20:00 IST

सातत्याने रोजचे तापमान ४० अंश सेल्सियसच्या घरात असल्याने नागरिक घराबाहेर कमी पडत आहेत

छत्रपती संभाजीनगर : निवडणुकीचे पडघम वाजले तसे कामगार नाक्यावर रोजंदारीने काम करणाऱ्या मजुरांची संख्या रोडावलेलीच दिसत आहे. त्यातच आजचे तापमान ४० अंश सेल्सियसच्या घरात होते. उन्हामुळे मजूर आले नाहीत की निवडणुकीत सोय होत असल्याने, हा सवाल आहे. निवडणुकीमुळे मजूर नाक्यावर फिरकत नसल्याचे बांधकाम व्यावसायिकांचे म्हणणे आहे. दुपारीही कामगार नाका ओसाड वाटत होता.

एरव्ही शहराच्या आसपास व औद्योगिक क्षेत्रात बांधकामे सुरू असून अनेक जण शहरातील हर्सूल, उस्मानपुरा, शहागंज, शिवाजीनगर, सातारा, देवळाई चौक, सिडको एन-३ कामगार नाक्यावर जाऊन मजूर नेतात. बांधकाम, खोदकाम, तसेच रस्ता, सिमेंट खडीकरण व माळीकामासाठीही मजुरांना बांधकाम व्यावसायिक रोजाने हजेरीवर नेतात. पण सध्या नाक्यावर मजुरांची संख्या रोडावली असून ते नाक्यावर फिरकताना दिसत नाहीत. दुकानदार व व्यावसायिकांना विचारणा केली असता मजूर वाटेल तेव्हा येतात अशा प्रतिक्रिया मिळाल्या. अनेक मजूर निवडणुकीच्या प्रचार कार्यालयात दिसतात.

उन्हाचा देखील परिणामसध्या राजकीय वातावरण उन्हासारखेच अधिक तापत असल्याने कामगार नाक्यावर बांधकाम व्यावसायिकांना मजुरांची कमतरता भासत आहे. काही जण गावाकडे मतदानालाही गेले आहेत, ते अद्याप आलेले नाहीत. सध्या आपल्या जिल्ह्यातही राजकीय घडामोडी जोरात सुरू असल्याने ओळखीचे कार्यकर्ते त्यांना कामास नेत आहेत.- प्रेम चव्हाण, कामगार नेता

शेवटी जेथे मजुरी, तिकडे कल...काम मिळावे यासाठी खेड्यापाड्यातून आलेल्या हंगामी मजुरांना रोजीरोटीसाठी सतत धावपळ करावीच लागते. पाणीटंचाई असल्याने बांधकामदेखील कमी झाले आहेत. शेवटी हाताला जे काम मिळेल, तिकडे कल असतो.-फकीरचंद अवचरमल, कामगार नेता

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४