शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगर भाजपमध्ये बंडखोरीचे संकेत; एकेका प्रभागातून डझनभर इच्छुक उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 18:09 IST

भाजपच्या नूतन कार्यालयात मनपा निवडणूक इच्छुकांची फॉर्म घेण्यासाठी रविवारी गर्दी उसळली होती. यात माजी नगरसेवकांसह नवीन कार्यकर्त्यांचा समावेश होता.

छत्रपती संभाजीनगरआगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपने रविवारी निवडणूक मैदानात येणाऱ्या इच्छुकांची माहिती मिळण्यासाठी उमेदवारी अर्ज देण्यास सुरुवात केली. आठ तासांत ९२२ इच्छुकांनी अर्ज घेतले. एकेका प्रभागातून डझनभर इच्छुक उमेदवारांनी अर्ज नेल्यामुळे पक्षासमोर योग्य उमेदवार निवडण्याचे मोठे आव्हान असणार आहे, शिवाय उमेदवारी न मिळाल्यास निर्माण होणारी नाराजी थोपविण्यात कोअर कमिटीला अपयश आले, तर बंडखोरी होण्याचे संकेतही पहिल्या दिवशीच्या गर्दीतून मिळाले आहेत.

सोमवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत इच्छुकांना पूर्ण माहितीसह अर्ज चिकलठाणा येथील पक्ष कार्यालयात जमा करावे लागणार आहेत. भाजपच्या नूतन कार्यालयात मनपा निवडणूक इच्छुकांची फॉर्म घेण्यासाठी रविवारी गर्दी उसळली होती. यात माजी नगरसेवकांसह नवीन कार्यकर्त्यांचा समावेश होता.

भाजपने केलेली विकासकामे, पक्ष संघटन बांधणी, सततच्या कार्यक्रमांमुळे पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी नियमित कार्यरत आहे. उमेदवारीच्या अपेक्षेने कार्यकर्ते काम करीत आहेत. त्यामुळे साहजिकच प्रत्येकाला मनपात जाण्याची इच्छा आहे; परंतु अर्ज घेण्यासाठी झालेली गर्दी पाहून उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा होण्याची चिन्हे आहेत. पहिल्या दोन तासांत ३४० अर्ज गेले. अर्जामध्ये व्यक्तिगत माहिती, पक्षातील जबाबदाऱ्या, लढलेल्या निवडणुका, सामजिक क्षेत्रातील जबाबदाऱ्या, संस्था, पदे, प्रभागातील सामाजिक समीकरणे, मतदारसंख्या व इतर माहिती विचारण्यात आली आहे.

योग्य उमेदवार देण्याचे आव्हान...पहिल्या दिवशी आठ तासांत ९२२ इच्छुकांनी अर्ज नेले. सोमवारी सायंकाळपर्यंत अर्ज जमा करावे लागतील. पक्षातील जबाबदारी, आजवर केलेले काम व इतर माहिती अर्जातून विचारण्यात आली आहे. एकेका प्रभागात ९ ते १२ जण इच्छुक आहेत. निकोप स्पर्धा असून, योग्य उमेदवार देण्याचे आव्हान पक्षासमोर आहे.- किशोर शितोळे, शहराध्यक्ष भाजप

प्रभागांचे वर्गीकरण...भाजपने प्रभागांचे ए, बी, सी, डी असे वर्गीकरण केले आहे. १२ प्रभागांत भाजप ए वर्गात आहे. म्हणजे या ठिकाणी पक्ष संघटन चांगले असून, येथील उमेदवार निवडून येण्याची शक्यता जास्त आहे. बी, सी आणि डी या वर्गात मोडणाऱ्या प्रभागांबाबत भाजप साशंक आहे. उमेदवारांची गर्दी देखील ए वर्गातील प्रभागात आहे. उर्वरित वर्गांमध्ये नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Rebellion signs in Chhatrapati Sambhajinagar BJP; Multiple candidates per ward.

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar BJP faces potential rebellion as numerous candidates vie for each ward in upcoming elections. Over 900 aspirants collected application forms within eight hours, creating a challenge for the party to select suitable candidates and manage dissent.
टॅग्स :BJPभाजपाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक