शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

अंतर्गत जलवाहिन्यांची झाली चाळणी; ठिकठिकाणी वाहिन्या फुटून रस्त्यावर वाहताहेत पाण्याचे लोट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 14:27 IST

जलवाहिन्या बदलण्याकडे महापालिकेने कधीच लक्ष दिले नाही. त्याचे परिणाम आता दिसून येत आहेत.

ठळक मुद्देजुन्या शहरातील जलवाहिन्या नगर परिषद काळात टाकण्यात आल्या आहेत. या जलवाहिन्यांचे आयुष्य किमान दोन दशकांपूर्वी संपलेले आहे.

औरंगाबाद : शहराची तहान भागविण्यासाठी राज्य शासनाने १६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन केले. शहरात पाणी आणणाऱ्या जलवाहिन्यांचे आयुष्य जसे संपलेले आहे तसेच अंतर्गत जलवाहिन्याही कमकुवत झाल्या आहेत. मंगळवारी शहरात ठिकठिकाणी जलवाहिन्या फुटण्याचे सत्र सुरू होते. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाहून गेले. 

जुन्या शहरातील जलवाहिन्या नगर परिषद काळात टाकण्यात आल्या आहेत. या जलवाहिन्यांचे आयुष्य किमान दोन दशकांपूर्वी संपलेले आहे. जलवाहिन्या बदलण्याकडे महापालिकेने कधीच लक्ष दिले नाही. त्याचे परिणाम आता दिसून येत आहेत. मंगळवारी रात्री गजानन महाराज मंदिराच्या पाठीमागील रोडवर जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी चौकात वाहत होते. ज्या ठिकाणी जलवाहिनी फुटली तेथे फुलांची झाडे विकणारे नागरिक आपल्या कुटुंबासह राहत होते. जलवाहिनी फुटल्याने या कुटुंबांची वाईट अवस्था झाली. फुटलेली जलवाहिनी एमआयडीसीची असू शकते असा युक्तिवाद महापालिकेकडून करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत जलवाहिनी कोणाची हे शोधण्याचे काम महापालिकेकडून करण्यात येत होते.

पुंडलिकनगर जलकुंभावरून जाणारी ही जलवाहिनी ३०० मि.मी. व्यासाची असून, ती महापालिकेची असल्याचे उशिरा सांगण्यात आले. मोंढ्यातील चौकात जलवाहिनीला गळती लागल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावरून वाहत होते. विशेष बाब म्हणजे जलवाहिनीतून पाणी वाया जात असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना नव्हती. ज्या अधिकाऱ्याकडे हा परिसर आहे, त्यांनी रात्री उशिरा माहिती घेतल्यानंतर गळती असल्याचे मान्य केले, तसेच बुधवारी काम सुरू होईल असे सांगितले. चंपा चौक येथे मागील काही दिवसांपासून जलवाहिनीला गळती लागली आहे. मात्र, येथे गळती नसल्याचा दावा उपअभियंत्यांनी केला.

मोंढ्यातील जलवाहिनी फुटलीजुन्या मोंढ्यातील जलवाहिनी  फुटून  मागील ४ दिवसापासून रस्त्यावर पाणी वाहते आहे. जिन्सी परिसरातील जलकुंभाला पाणीपुरवठा करणारी ही जलवाहिनी जुन्या मोंढ्यातील सर्कल येथे फुटली आहे. त्यातून हजारो लिटर पाणी रस्त्यावरून वाहत जाऊन जाफरगेट परिसरातील खड्ड्यात तुंबत आहे. त्यात येथे मागील आठवडाभरापासून तीन ठिकाणी ड्रेनेज लाईन तुंबली आहे. ते सुद्धा पाणी खड्ड्यात साठून संपूर्ण जाफरगेट परिसरात दुर्गंधी पसरली आहे. विशेष म्हणजे येथून हाकेच्या अंतरावर महानगरपलिकाचे झोन कार्यालय आहे. येथील कर्मचाऱ्यांना जलवाहिनी व ड्रेनेज दुरुस्तीची विनंती केली असता आमच्या झोन अधिकाऱ्याला येऊन भेटा, असे उत्तर कर्मचारी देत असल्याचे सतीशचंद्र सिकची यांनी सांगितले.

चंपाचौकत जलवाहिनी फुटलीमागील आठवड्यापासून चंपाचौक येथे जलवाहिनी फुटली आहे. जलवाहिनी फुटल्याने रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचते आहे.  रिक्षा, दुचाकी खड्ड्यात आदळत आहेत. येथील दुकानदारांनी सांगितले की, मागील आठवड्यापासून जलवाहिनी फुटली आहे. पण महानगरपालिकेचे कर्मचारी फिरकले नाही. जलवाहिनी दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादWaterपाणी