शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक दौलताबाद किल्यास आगीचा वेढा; लाखमोलाची वनसंपदा नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 19:18 IST

दौलताबाद घाटाखाली आम मशिदीजवळ औरंगाबाद- खुलताबद रस्त्यावर दोन्ही बाजूंनी आग पसरल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

ठळक मुद्देअग्निशमन दल, वनविभागासह नागरिकांनी केले शर्थीचे प्रयत्न

दौलताबाद : ऐतिहासिक दौलताबाद किल्ल्याच्या पाठीमागील परिसराला शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली. शेकडो एकर परिसरात ही आग झपाट्याने पसरल्याने यात लाखमोलाची वनसंपदा नष्ट झाली आहे. दुपारी उन्हाचा पारा अधिक असल्याने आग झपाट्याने वाढल्याने त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण झाले. यासह काही भागात अग्निशमन दलाची गाडी जाऊ न शकल्याने सायंकाळी उशीरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु होते.

किल्ल्याच्या पाठीमागील भागात दुपारी १ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. ही बाब लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी घटना स्थळांकडे धाव घेत आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र, या भागात मोठ्या प्रमाणात रानतुळशीची वाळलेली झाडे व गवत असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. आगीवर नियंत्रण मिळणे कठीण असल्याचे लक्षात आल्याने नागरिकांनी औरंगाबाद अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. वाळलेल्या गवतामुळे आग वाढत गेली होती. या आगीत शेकडो छोटी, मोठी झाडे, झुडपांसह अनेक सरपटणारे प्राणीही जळून खाक झाले. आग वाढत जाऊन नर्सरीपर्यंत पोहोचल्यानंतर ती पुढे सरकू नये यासाठी वनरक्षक आर.एस. मुळे यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दल जिथपर्यंत पोहोचते तिथपर्यंत आग आटोक्यात आली. मात्र, किल्ल्याच्या ज्या भागात अग्निशमन दल पोहोचू शकले नाही, त्या भागात आग धुमसतच होती. या आगीमुळे दौलताबाद गावासह परिसरात धुराचे लोळ उठले होते. या भागातून जाणाऱ्या वाहनधारकांना धुरामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

वाहतूक विस्कळीत झालीदौलताबाद घाटाखाली आम मशिदीजवळ औरंगाबाद- खुलताबद रस्त्यावर दोन्ही बाजूंनी आग पसरल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी दौलताबाद पोलीस उपनिरीक्षक रवी कदम व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Doulatabad Fortदौलताबाद किल्लाAurangabadऔरंगाबादfireआग