शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात तीन वाघांच्या मोबदल्यात कर्नाटकातून येणार सिंह, अस्वल, कोल्हा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 16:05 IST

प्राणिसंग्रहालयाला दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक भेट देतात.

छत्रपती संभाजीनगर : सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयात वाघांची संख्या बरीच आहे. तीन वाघ देऊन महापालिका सिंह, अस्वल आणि कोल्ह्याची नरमादी घेणार आहे. कर्नाटक राज्यातील शिवमोगा प्राणिसंग्रहालयाला वाघ देऊन त्यांच्याकडील तीन वेगवेगळ्या प्राजीतींचे प्राणी घेण्यात येतील.

सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात २५० पेक्षा अधिक प्राणी आहेत. प्राणिसंग्रहालयाला दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक भेट देतात. प्राणिसंग्रहालयाचे मुख्य आकर्षण म्हणजे वाघ आहेत. येथील प्रजनन दरही इतर प्राणीसंग्रहालयाच्या तुलनेत सर्वाधिक आहे. प्राणिसंग्रहालयात सिंह नसल्याने बच्चे कंपनीचा हिरमोड होतो. प्राणिसंग्रहालयात ७ पिवळ्या पट्ट्याचे वाघ आणि ५ पांढऱ्या पट्ट्याचे वाघ आहेत. कर्नाटकातील शिवमोगा प्राणिसंग्रहालयाने मनपाच्या प्राणिसंग्रहालयाशी संपर्क साधून तीन वाघ देण्याची मागणी केली. मोबदल्यात सिंह, अस्वल, कोल्ह्याची जोडी देण्याची तयारी दर्शविली.

अदलाबदलीस हवी मान्यतामनपाच्या प्राणिसंग्रहालयाने केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे प्राण्यांची अदलाबदल करण्यास मान्यता मिळावी, म्हणून प्रस्ताव पाठविला आहे. शिवमोगा प्राणिसंग्रहालयाकडून अद्याप प्रस्ताव पाठविण्यात आलेला नाही. त्यांच्याकडून प्रस्ताव जाताच केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडून मंजुरी मिळाल्यानंतर प्राण्यांची अदलाबदली केली जाणार असल्याचे उपायुक्त विजय पाटील यांनी सांगितले.

मिटमिट्यात सफारी पार्कमिटमिटा येथे महापालिकेचे भव्य प्राणिसंग्रहालय उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. दीडशे एकर जागेत हे प्राणिसंग्रहालय स्मार्ट सिटीच्या माध्यमाने तब्बल २४० कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येत आहे. भविष्यात सिद्धार्थमधील प्राण्यांचे स्थलांतर करण्याची प्रक्रिया मनपाला सुरू करावी लागणार आहे. त्यामुळे या प्राणिसंग्रहालयात नवीन प्राणी आणून त्यांना येथील वातावरणाशी जुळवून घेण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरTigerवाघ