शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाकडून सवलतींचा वर्षाव; पण विद्यार्थ्यांच्या नशिबी भोपळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2021 16:05 IST

Dr. Babasaheb Ambedkar Marathvada University: शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी महाविद्यालयांकडून अडवणूक 

औरंगाबाद : विद्यापीठ कार्यक्षेत्रातील जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे यंदा नवीन शैक्षणिक वर्षात पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. तथापि, बहुतांश महाविद्यालयांमध्ये प्रवेशाच्या वेळीच विद्यार्थ्यांकडे शैक्षणिक शुल्क जमा करण्याबाबत तगादा लावला जात असल्याच्या प्रकार समोर आला आहे.

यंदा विद्यापीठ कार्यक्षेत्रातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत अतिवृष्टी झाल्यामुळे ओला दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हाती आलेले पिकांची माती झाली, अनेकांना रोजगारांची भ्रांत आहे. पालकांची आर्थिक स्थिती हालाखीची झाली आहे. यासाठी व्यवस्थापन परिषदेने शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार विद्यापीठाने एका परिपत्रकाद्वारे महाविद्यालयीन व विद्यापीठाच्या विभागांत नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क आकारले जाऊ नये. यासंबंधीची आर्थिक तरतूद विद्यापीठ व महाविद्यालयांनी व्यवस्थापनाच्या एकत्रित निधीतून करण्याच्या सूचना दिल्या.

यासंदर्भात विद्यार्थी सेनेचे विद्यापीठ प्रमुख डॉ. तुकाराम सराफ यांनी आरोप केला की, सध्या महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्षाची प्रवेशप्रक्रिया सुरू असून बहुतांश महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडे शैक्षणिक शुल्काची सक्ती केल्याच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात आपण कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची भेट घेऊन संबंधित महाविद्यालयांविरुद्ध प्राप्त तक्रारी सादर करणार आहोत. विद्यापीठ विद्यार्थ्यांसाठी सवलतींचा वर्षाव करते; पण प्रत्यक्षात विद्यार्थ्यांपर्यंत त्या पोहोचत नाहीत. यासंदर्भात विद्यापीठाने महाविद्यालयांना शैक्षणिक शुल्क माफ करण्याबाबत सक्त ताकीद द्यावी.

विद्यापीठावर ५० लाखांचा भारकुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सांगितले की, संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठ विभागांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाचे प्रवेश सुरू आहेत. या सवलतीमुळे विद्यापीठाला जवळपास ५० लाख रुपयांचा भार उचलावा लागेल, असा अंदाज आहे. १५ नोव्हेंबरनंतर प्रवेशित विद्यार्थी, त्यामध्ये विविध शिष्यवृत्त्यांचे लाभार्थी विद्यार्थी यांचा ताळमेळ लावून विद्यापीठाला किती आर्थिक भार उचलावा लागेल, याची निश्चित आकडेवारी समोर येईल. यासंबंधी सर्व विभागांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण