शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ओळखपत्र दाखवा अन् मोफत उपचार घ्या; ईसीजी, एक्स-रे, सीटी स्कॅनही नि:शुल्क

By संतोष हिरेमठ | Updated: August 17, 2023 15:16 IST

ओपीडीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांना बाहेरून औषधे, इतर साहित्य खरेदी करण्यासाठी चिठ्ठी देऊ नये, अशी सूचना.

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा रुग्णालयासह सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत असलेल्या जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये १५ ऑगस्टपासून नि:शुल्क रुग्णसेवेला सुरुवात झाली. शासनाने अधिकृत केलेले ओळखपत्र दाखविले की अगदी मोफत उपचार घेता येत आहेत. इतकेच काय ईसीजी, एक्स-रे, सीटी स्कॅनसारख्या तपासण्याही मोफत होत आहेत. पहिल्याच दिवशी अनेक रुग्णांनी नि:शुल्क रुग्णसेवा घेतली.

पहिल्या दिवशी किती रुग्णांवर मोफत उपचार?जिल्हा सामान्य रुग्णालयात नि:शुल्क रुग्णसेवेला सुरुवात झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. दयानंद मोतीपवळे यांनी सांगितले. पहिल्या दिवशी ओपीडीत ६१० रुग्णांवर नि:शुल्क उपचार करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. पद्मजा सराफ यांनी दिली. यात ३५ जणांचे एक्स-रे, ५२ जणांची अल्ट्रासोनोग्राफी आणि ५ जणांचे सीटी स्कॅन करण्यात आले.

किती पैशांची बचत?जिल्हा रुग्णालयात पूर्वी ओपीडीसाठी १० रुपये, एक्स-रेसाठी ७५ रुपये, अल्ट्रासोनोग्राफीसाठी १०० रुपये आणि सीटी स्कॅनसाठी ३०० रुपये आकारण्यात येत असत. परंतु, आता हे सर्व मोफत होत आहे.

नि:शुल्क सेवेत काय काय?- शासनाने अधिकृत केलेल्या ओळखपत्राच्या आधारे नि:शुल्क नोंदणी.- सर्व प्रकारच्या तपासण्या नि:शुल्क.- ओपीडीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांना बाहेरून औषधे, इतर साहित्य खरेदी करण्यासाठी चिठ्ठी देऊ नये, अशी सूचना.- क्वचित प्रसंगी बाहेरील औषधे रुग्णाला देणे आवश्यक असल्यास आरकेएस अनुदानातून खरेदी करून रुग्णाला मोफत उपलब्ध करून देणे.- ईसीजी, एक्स-रे, सीटी स्कॅन, प्रयोगशाळा चाचण्या नि:शुल्क.- आंतररुग्ण विभागात (आयपीडी) दाखल रुग्णाला डिस्चार्ज देताना कोणतेही शुल्क लागणार नाही.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादdoctorडॉक्टरHealthआरोग्य