शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

छावा श्रमिक संघटनेचे शोले स्टाईल आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 11:01 AM

मराठा आरक्षणाला ९ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली. तेव्हापासून मराठा समाज राज्यभर आंदोलन करीत आहेत. शनिवारी शहरातील पुंडलिकनगर जलकुंभावर चढून छावा श्रमिकअसंघटनेने शोले स्टाईल आंदोलन करून लक्ष वेधले.

औरंगाबाद: मराठा क्रांती मोर्चाच्या विविध मागण्यांसाठी छावा श्रमिक संघटनेतर्फे शनिवारी सकाळी पुंडलिकनगर जलकुंभावर चढुन शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले. 

मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी आतापर्यंत विविध आंदोलने झाली. ४२ तरुणांनी आत्मबलिदान दिले, सुमारे १ हजार ३०० आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे नोंदविले. एवढ्या प्रयत्नानंतर प्राप्त आरक्षणाला ९ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली. तेव्हापासून मराठा समाज राज्यभर आंदोलन करीत आहेत. शनिवारी शहरातील पुंडलिकनगर जलकुंभावर चढून छावा श्रमिकअसंघटनेने शोले स्टाईल आंदोलन करून लक्ष वेधले.

मराठा आरक्षणाची स्थगिती उठवावी, मराठा आरक्षण लढ्यात आत्मबलिदान देणाऱ्या तरुणांच्या वारसाला त्वरित १० लाख रुपये आणि नोकरी द्यावी, यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होतेे. पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र साळोखे, सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरिक्षक मीरा चव्हाण आणि अन्य अधिकारी, कर्मचारी यांनी आंदोलकांना विनंती करून खाली उतरविले. आंदोलक जलकुंभावरुन उतरताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

एक मराठा लाख मराठा, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे यासह विविध घोषणा आंदोलकांनी दिल्या. ज्ञानेश्वर गायकवाड, शैलेश भिसे, ज्ञानेश्वर घारे , दगडू शिंगटे, संजय नलावडे आणि किशोर जाधव आदींनी आंदोलनात सहभाग नोंदविला.

पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्याचे समजताच आमदार अतुल सावे यांनी पोलीस ठाण्यात जाऊन त्यांची भेट घेतली. मराठा समाजाचा प्रश्न विधानसभेत मांडून सरकारकडून मागण्या मान्य करून घेऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले.

टॅग्स :agitationआंदोलनMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षण