शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! वाल्मीच्या महासंचालकांना बैठकीतच ठेकेदाराकडून धक्काबुक्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 13:20 IST

तत्कालीन महासंचालक नाथ, ठेकेदार चव्हाण यांच्यावर सदर गेस्ट हाऊस प्रकरणातच १ कोटी ९३ लाख रुपयांचा अपहार केल्याचा ठपका

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाच्या अनुषंगाने वाल्मीत सुरू असलेल्या बैठकीतच एका ठेकेदाराने महासंचालक तथा आयएएस अधिकारी प्रकाश खपले (५५) यांना धक्काबुक्की करीत शिवीगाळ केली. मंगळवारी सायंकाळी ५ वाजता ही घटना घडली. राजेश चव्हाण (रा. प्रकाशनगर) याच्यावर याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मृद व जलसंधारण विभागाचे आयुक्त प्रकाश खपले यांच्याकडे जानेवारी २०२५ पासून वाल्मीच्या महासंचालक पदाचा अतिरिक्त पदभार आहे. २२ एप्रिलला दुपारी ४:३० वाजता विभागाच्या अन्य अधिकाऱ्यांसोबत राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादनाबाबत खपले यांच्या दालनात बैठक सुरू होती. चव्हाणने दालनात प्रवेश करत वाल्मीतील त्याचे पोकलँड परत करण्याची मागणी केली. तसेच त्याला मिळालेले विभागाच्या गेस्ट हाऊसच्या नूतनीकरणाचे काम करू देण्याची मागणी केली. खपले यांनी चव्हाणला सदर काम रद्द झाले असून, कामाचे १.९३ कोटी रुपये अग्रीम रक्कम परत करण्याची सूचना केली. त्यावरून त्यांच्यात वाद उफाळून आले. चव्हाणने संतप्त होत शिवीगाळ सुरू केली. तुम्हाला हे भारी पडेल, अशी धमकी देत त्यांच्या अंगावर धावून गेला. चव्हाण यांच्या इतर सहकाऱ्यांनी त्याला पकडून दालनाबाहेर काढले. त्यानंतर खपले यांनी स्वत: चव्हाण विरोधात तक्रार दिली.

गेस्ट हाऊसचा वाद काय ?चव्हाणच्या दाव्यानुसार, तत्कालीन महासंचालक नाथ यांच्या कार्यकाळात त्यांना टेंडरद्वारे वाल्मी गेस्ट हाऊसच्या नूतनीकरणाचे कंत्राट मिळाले होते. त्यासाठी त्यांना अग्रीम रक्कम म्हणून १ कोटी ९३ लाख प्राप्त झाले होते. खपले यांच्या माहितीनुसार, सदर गेस्ट हाऊसची इमारत ५० वर्षे जुनी आहे. त्यामुळे त्याचे नूतनीकरण आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसून त्यासंबंधाने नियुक्त समितीने शासनाला अहवाल दिला आहे.

दोघांवर अपहाराचा ठपकातत्कालीन महासंचालक नाथ, ठेकेदार चव्हाण यांच्यावर सदर गेस्ट हाऊस प्रकरणातच १ कोटी ९३ लाख रुपयांचा अपहार केल्याचा ठपका ठेवत विभागाने सातारा पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला आहे. त्याचा तपास सुरू असल्याचे सातारा पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर