शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! आरटीईतून मिळतोय श्रीमंतांना प्रवेश; दुर्बलांचा हक्क हिरावण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 19:06 IST

Right To Education Aurangabad News शिक्षण संस्थाचालक, श्रीमंत व्यक्तींच्या पाल्यांची नावे या योजनेच्या लाभार्थींमध्ये दिसू लागली आहेत.

ठळक मुद्देउत्पन्न जास्त सिद्ध कसे करणार तक्रार नसल्याने शिक्षण विभाग हतबल

औरंगाबाद : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शालेय प्रवेशात २५ टक्के आरक्षणाची तरतूद आहे. मात्र, या योजनेतून श्रीमंतांनाही नामांकित इंग्रजी शाळेत मोफत प्रवेश मिळत आहे. मात्र, पुराव्यांसह तक्रारी नसल्याने शिक्षण विभागही हतबल झाल्याने याला कसा चाप बसेल, असा सवाल उपस्थित झाला आहे.

आरटीईअंतर्गत जिल्ह्यातील ५८४ शाळांसाठी १६,५०० पेक्षा अधिक अर्ज आले होते. त्यापैकी ५६७६ विद्यार्थ्यांची निवड झाली. तर १९१४ जणांची सोडतीनुसार प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली. पहिल्या फेरीत ३ हजार १०१ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. उर्वरित १५३९ जागांसाठी प्रतीक्षा यादीतील प्रवेश ३ ऑक्टोबरपासून सुरू आहेत. यात एकामागून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. शिक्षण संस्थाचालक, श्रीमंत व्यक्तींच्या पाल्यांची नावे या योजनेच्या लाभार्थींमध्ये दिसू लागली आहेत.

शिक्षणाधिकारी म्हणतात...दरवर्षी सुमारे साठ हजारांवर अर्ज ऑनलाईन स्वरूपात येतात. ते थेट एनआयसीएण्डला जातात. तेथून छाननी होऊन या प्रवेशाच्या याद्या बनतात. कागदपत्रे ऑनलाईन दाखल करताना निकषात बसावे यासाठी अनेक जण शाळेजवळ राहतो, असे दाखवतात. तर अनेक व्यापारी, सधन व्यक्ती कमी उत्पन्नाचे प्रमाणपत्र मिळवतात. याआधारे ते योजनेच्या निकषात बसल्याने त्यांच्या पाल्यांना प्रवेश मिळतो. तर शहरातील अशाच प्रकरणात एका शाळेच्या प्रवेशाची आम्ही तपासणी, प्रत्यक्ष स्थळ पडताळणी केली. मात्र, त्यातून काहीच निष्पन्न झाले नसल्याचे जयस्वाल यांनी सांगितले.

उत्पन्न जास्त सिद्ध कसे करणारएका शिक्षण संस्थाचालकाच्या कुटुंबातील मुलीला प्रवेश मिळाल्याचे कळाले. त्याने ४५ हजार रुपयांचे उत्पन्न प्रमाणपत्र दाखवले आहे; पण त्यांचे उत्पन्न जास्त आहे, हे कसे सिद्ध करणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. असे प्रकरण असल्यास पुराव्यानिशी तक्रार केल्यास त्याप्रकरणी कारवाई केली जाईल, असे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जयस्वाल यांनी सांगितले.

टॅग्स :Educationशिक्षणAurangabadऔरंगाबादSchoolशाळा