शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

खासदार निधीतून कंत्राट देतो, आमिष देत ५६ लाखांची फसवणूक; हवाल्यामार्फत घेतली रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 16:11 IST

मनपाची अपक्ष निवडणूक लढलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याला तिघांकडून गंडा; वेदांतनगर ठाण्यात गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : राज्यसभा खासदारांच्या निधीच्या कामांचे कंत्राट मिळवून देण्याचे आमिष दाखवून निवृत्त अधिकाऱ्याला तिघांनी चार वर्षांत ५६ लाखांचा गंडा घातला. भारत राजू शेंडगे (रा. केसरसिंगपुरा), ज्योतिका पवार, अश्विन जाधव यांच्यावर वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तुषार बासनीवाल (रा. पदमपुरा) यांचे वडील कृष्णलाल बासनीवाल जिल्हा उद्योग केंद्रातून निवृत्त झाले आहेत. त्यांनी २०१५ मध्ये मनपाची अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. तेव्हा शेंडगे त्यांच्या संपर्कात आला. त्याने राज्यसभेचे खा. डॉ. भागवत कराड यांचा मुलगा हर्षवर्धन यांच्यासोबत चांगला परिचय असून, मामा कराड यांच्या गाडीवर चालक असल्याचे सांगितले. तुषार यांनी सा. बां. विभागातून बांधकाम सुपरवायझरचा परवाना काढलेला होता. २०२२ मध्ये शेंडगेने त्यांना परवान्यावर खासदार निधीतून काम मिळवून देण्याचे आमिष दाखवले. प्रक्रियेच्या नावाखाली त्यांच्याकडून ३२ हजार रुपये उकळले. सप्टेंबर २०२३ मध्ये खासदारांच्या निधीतून १ कोटीची कामे मिळाल्याचे सांगत जिल्हा न्यायालयासमोरील रस्त्याचे काम दाखवून पुन्हा पैसे उकळले. बासनीवाल त्याला वारंवार वर्कऑर्डरची मागणी करत होते. शेंडगे मात्र त्यांना टाळत गेला.

साहेबांच्या नावाने महिलेचाही कॉल३० सप्टेंबर, २०२३ रोजी ज्योतिका पवार नामक महिलेने कॉल करून ‘साहेबांच्या कार्यालयातून’ बोलत असल्याचे सांगितले. तिच्या सांगण्यावरून तक्रारदाराने शेंडगेला २७ हजार रुपये दिले. त्यावेळी त्याच्यासोबत कुणाल गायकवाड नावाची व्यक्ती होती. आणखी ७ वर्कऑर्डरचे कारण देऊन शेंडगेने त्यांच्याकडून ६ डिसेंबर २०२३ रोजी १५ लाख रुपये उकळून नूतन कॉलनीतील कार्यालयात जाण्याचे नाटकही केले.

हवालाद्वारे पैशांची देवाणघेवाणशेंडगेने जानेवारी २०२४ नंतर हवालाद्वारे पैसे स्वीकारले. जवळपास १७ व्यक्ती आणि अनोळखी कंपनीच्या नावे १२ लाख ४३ हजार रुपये स्वीकारले. १२ सप्टेंबर २०२४ रोजी त्याचा साथीदार अश्विन जाधवने त्यांना पैसे देण्याचे आमिष दाखवले. २५ सप्टेंबर २०२४ रोजी अखेर बासनीवाल यांनी कराड यांच्या कार्यालयात जाऊन खातरजमा केली. तेव्हा खासदारांचे स्वीय सहायक यश देवकर यांनी शेंडगेला कुठलेही काम दिलेले नसून तुम्हाला खोटे सांगितले गेल्याचे सांगितले. तोपर्यंत शेंडगेने त्यांच्याकडून ५६ लाख ३८ हजार रुपये उकळले होते.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी