शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! जुळ्या मुलींना हॉस्पिटलमध्ये ठेऊन आईसह नातेवाईक पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 13:24 IST

रुग्णालयाचे बील भरणे शक्य नसल्याचे दिले कारण

ठळक मुद्देखाजगी रुग्णालयात एका महिलेने २१ आॅक्टोबर रोजी दोन जुळ्या मुलींना जन्म दिला.

औरंगाबाद: नवजात जुळ्या मुलींच्या उपचाराचे बील भरणे शक्य नसल्याने चिमुकल्या मुलींना रुग्णालयात सोडून तिची आईसह अन्य नातेवाईक पसार झाल्याची घटना हडकोत ३० आॅक्टोबर रोजी समोर आली. याविषयी माहिती मिळताच सिडको   पोलिसांनी चिमुरडींच्या  वडिलांशी संपर्क साधला असता त्यांनी रुग्णालयाचे बील भरण्यासाठी पैसे नसल्याचे आणि आधीच एक मुलगी असल्याचे कारण सांगून मोबाईल बंद केला.  

जळगाव रोडवरील एका खाजगी रुग्णालयात एका महिलेने २१ आॅक्टोबर रोजी दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. मुलींचे वजन कमी असल्याने त्याच दिवशी दोन्ही मुलींना हडकोतील निमाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे  दोन दिवस उपचार केल्यानंतर रुग्णालयांनी चिमुकलींच्या आई-वडिलांना पैसे भरण्याचे सांगितले. दोन दिवस ते भरतो असे म्हणाले आणि अचानक  रुग्णालयातून पसार झाले. यानंतर तीन दिवस रुग्णालयाने मुलींच्या वडिलांशी संपर्क साधून तातडीने बिल भरण्याचे सांगितले. मात्र त्यांनी रुग्णालयास प्रतिसाद दिला नाही. ही बाब समजल्यानंतर रुग्णालयाने सिडको पोलीस ठाण्याला याविषयी कळविले. सिडको पोलिसांनी याबाबत बाल कल्याण समितीकडे आपला अहवाल पाठविला.  समितीने दोन्ही मुलींना संगोपनासाठी भारतीय समाज सेवा केंद्र या अनाथालयाच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले.   १ लाख ७० हजार रुपये भरा  बाल कल्याण समितीचे आदेश घेऊन अनाथलयाचे कर्मचारी दोन्ही चिमुकलींना ताब्यात घेण्यासाठी रुग्णालयात गेले तेव्हा तेथील डॉक्टरांनी त्यांना १ लाख ७० हजार रुपयांचे बील जमा करण्याचे सांगितले. या मुलींवरील उपचाराचे बील भरल्यानंतरच त्यांना घेऊन जा असे बजावत मुलींना ताब्यात देण्यास नकार दिला.   सिडको पोलिसांनी वडिलांशी साधला संपर्क पण..  दोन्ही मुलींना रुग्णालयात सोडून आई प्राची आणि वडिल मोहित भिकुलाल भंडारी (रा. सिल्लोड) हे पसार झाल्याचे समजल्यानंतर सिडको ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ जाधव यांनी मोहितशी संपर्क साधला तेव्हा त्याने त्याच्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. शिवाय मोहितच्या सास-यांनीही जावई मोहित ऐकत नाही, त्यास आधीच एक मुलगी आहे, आम्ही काही करू शकत नसल्याचे नमूद करून मोबाईल फोन बंद केले.  

आम्ही मुलींच्या उपचारावर खर्च केला  दोन्ही मुलींचे वजन कमी असल्याने त्यांना आमच्या रुग्णालयातील अति दक्षता कक्षात दाखल करण्यात आले तेव्हापासून आम्ही त्यांच्यावर उपचार करीत आहोत.मुलींचे आई-वडिल त्यांना सोडून गेल्यानंतर त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांच्यावरील उपचारासाठी आम्ही खर्च केला. रुग्णालयाचे बील मिळावे, एवढीच अपेक्षा.- डॉ.संतोष मंदे्रवार, निमाई हॉस्पिटल.  

टॅग्स :hospitalहॉस्पिटलAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीFamilyपरिवार