शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
6
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
7
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
10
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
11
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
12
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
13
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
14
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
15
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
16
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
17
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
18
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
19
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
20
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात

धक्कादायक ! कारागृहात कैद्याला डॉक्टर ६ फुटांवरून तपासतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 19:54 IST

कारागृहातील कैदी आणि तेथील अधिकारी, कर्मचारी यांना प्राथमिक उपचाराची सोय व्हावी याकरिता कारागृहामध्ये दवाखाना आहे.

ठळक मुद्दे जेल अधीक्षकांची तक्रार कैद्याला वेळेत घाटीत न पाठविल्याने मृत्यू 

- बापू सोळुंके

औरंगाबाद : हर्सूल मध्यवर्ती कारागृहात नियुक्त डॉक्टर ५ ते ६  फुटांवर कैदी रुग्णाला उभे करून त्यांची तपासणी करतात. कैद्यांना हात न लावता कर्मचाऱ्यामार्फत ईसीजी काढणे आणि अन्य औषधोपचार करतात. एवढेच नव्हे, तर एका कैदी रुग्णाने तक्रार करूनही त्याला वेळेत घाटीत न पाठविल्यामुळे त्याचा मृत्यू झाला, अशी तक्रार कारागृह प्रशासनाने आरोग्य विभागाकडे पाठविल्याचे समोर आले. 

हर्सूल मध्यवर्ती कारागृहात दीड हजाराहून अधिक कैदी आहेत. कारागृहातील कैदी आणि तेथील अधिकारी, कर्मचारी यांना प्राथमिक उपचाराची सोय व्हावी याकरिता कारागृहामध्ये दवाखाना आहे. डॉ. जहागीरदार आणि डॉ. कुंडलिकर तेथे तैनात आहेत. कारागृहातील कैदी आजारी पडल्यास सर्वप्रथम कारागृहातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना  बोलावण्यात येते.  त्यांच्यावर उपचार केले जातात. कैद्यांना विशेष उपचाराची गरज असेल तर त्यांना कारागृहामधून घाटी रुग्णालयात पाठविण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकारी देतात. कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी जहागीरदार हे रुग्ण कैद्यांना ५  ते ६ फूट अंतरावर उभे राहण्यास सांगतात. स्टेथोस्कोपने त्यांची तपासणी करीत नाहीत. कैद्यांच्या आरोग्याकडे लक्ष देत नसल्यामुळे एका कैद्याला प्राणास मुकावे लागल्याची तक्रार प्रशासनाने आरोग्य विभाग आणि कारागृहाच्या वरिष्ठ कार्यालयास पाठविली आहे.

या तक्रारीत म्हटले की, २४ मे रोजी रात्री  कैदी सचिन गायकवाड याची प्रकृती ठीक नसल्याची तक्रार केल्यामुळे त्याला डॉ. जहागीरदार यांना दाखविण्यात आले. त्यावेळी जहागीरदार यांनी त्यांना दूर उभे करून विचारपूस केली. यानंतर त्यास बराकीत पाठवले. दोन तासांनंतर कैद्याला त्रास होत असल्यामुळे पुन्हा डॉक्टरांना दाखविण्यात आले. त्यावेळी त्याला  घाटीत नेण्याचा सल्ला दिला. पोलिसांनी त्याला घाटी रुग्णालयात नेले. मात्र, तेथे अवघ्या काही तासांत त्याचा मृत्यू झाला. डॉ. जहागीरदार यांनी कैद्याला वेळेत घाटीत पाठवले असते तर तो वाचला असता.

प्रशासन घेतेय काळजी तीन महिन्यांपासून शहरात कोरोनाची साथ बळावली आहे. कोरोनाने कारागृहामध्ये शिरकाव केला. एकाच वेळी २९ कैद्यांना कोरोनाची बाधा झाली. १४ कारागृहरक्षक आणि अधिकाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. कैद्यांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रशासन काळजी घेत असल्याचा दावा करण्यात आला होता. 

डॉक्टरांनी केला आरोपाचा इन्कार; कारागृह अधीक्षकच करतात आमचा छळ आरोग्य विभागात २५ वर्षांपासून रुग्णसेवा करतो. कारागृह अधीक्षकांचे आरोप खोटे आणि बिनबुडाचे आहेत.  कैदी गायकवाडचा मृत्यू नैसर्गिक होता. आम्ही कैद्याच्या आरोग्याची मनापासून काळजी घेतो. कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव हे आम्हाला कैद्यासारखी वागणूक देतात. ते  आमचा मानसिक आणि शारीरिक छळ करीत आहेत. याविषयी आरोग्य उपसंचालक आणि कारागृह उपमहानिरीक्षकांकडे तक्रारी केल्या आहेत. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिसjailतुरुंग