शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

धक्कादायक ! अनाथ मुलीचे १६ व्या वर्षांत दोन लग्न; त्यानंतर झाली सामूहिक अत्याचाराची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 13:16 IST

Rape on Minor Girl : घर सोडून रेल्वेस्टेशन परिसरात झोपलेल्या पीडितेवर तीन नराधमांनी अत्याचार केले.

ठळक मुद्दे आभागी तरुणीवर अत्याचार करणारे कोण याचे कोडे उलगडले नाही.रेल्वे स्टेशन परिसरात झाला अत्याचार

औरंगाबाद : आई-वडिलाचे बालपणातच छत्र हरपल्याने दत्तक आई-वडिलांनी तिचे अवघ्या १६व्या वर्षी तिचे राजस्थानातील तरुणासोबत लग्न लावले. मात्र, तेथेही तिचा छळ सुरू झाल्यानंतर ती शेजारच्या तरुणाच्या भावाच्या घरी मदतीने खासगी ट्रॅव्हल बसने औरंगाबादेत पोहोचली. त्यांच्याशी झालेल्या कुरबुरीनंतर घराबाहेर पडलेल्या पीडितेवर औरंगाबाद रेल्वेस्थानक परिसरात भेटलेल्या तरुणाने तिला स्वतःच्या घरी नेले आणि मंदिरात तिच्यासोबत लग्न केले. मात्र तोही मारहाण करू लागल्यामुळे त्याचे घर सोडून रेल्वेस्टेशन परिसरात झोपलेल्या पीडितेवर तीन नराधमांनी अत्याचार केले. या आभागी तरुणीवर अत्याचार करणारे कोण याचे कोडे पोलिसांना तीन दिवसांनंतरही उलगडता आले नाही.

वरिष्ठ सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार रिमा (काल्पनिक नाव ) उत्तर प्रदेशातील रहिवासी. ८ जानेवारी रोजी रात्री चिकलठाणा रेल्वेस्टेशन येथे ती एकटीच बसलेली असल्याचे पाहून सतर्क नागरिकाने पोलिसांना आणि चाइल्डलाइनला फोन करून तिच्याविषयी कळविले. पोलीस आणि चाइल्डलाइनच्या महिला कार्यकर्त्यांनी तिला विश्वासात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. नंतर तिला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिने दिलेल्या जबाब महिला दक्षता समितीच्या पदाधिकारी आणि पोलीस अधिकारी यांचा थरकाप उडविणारा होता. औरंगाबाद रेल्वेस्थानक येथे ५ रोजी एकटी असताना पोलिसांनी तिला तेथून बाहेर जाण्यास सांगितले. यामुळे ती स्थानकातून बाहेर पडली आणि काही अंतरावर झाडाच्या आडोशाला जाऊन झोपली. रात्री २ ते ३ वाजेच्या सुमारास ती लघुशंका करण्यासाठी तेथून काही अंतरावर गेली तेव्हा तीन नराधम तिच्यावर तुटून पडले. त्यांनी तिला तेथून उचलून अन्य ठिकाणी नेले आणि अत्याचार केल्याने ती बेशुद्ध झाली. ती शुद्धीवर आली तेव्हा तिच्या अंगावरील कपडे बाजूला पडलेले दिसले. तिने ते कपडे घातले. याप्रकरणी उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला.

पोलिसांकडून संशयितांची चौकशीरेल्वेस्थानक परिसर सतत गुन्हेगार आणि नशेखोरांचा अड्डा बनलेला असतो. रात्रपाळीचे रिक्षाचालक नशेत प्रवासी वाहतूक करतात. त्यांच्यावर कुणाचेही नियंत्रण नाही. यामुळे तिच्यावर अत्याचार करणाऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी संशयितांची धरपकड आणि चौकशी सुरू केली. नराधमाची ओळख पटविणे पोलिसांसाठी आव्हान आहे. पोलीस उपायुक्त मीना मकवाना, सहायक पोलीस आयुक्त विवेक सराफ हे स्वतः या तपासांवर लक्ष ठेवून आहेत.