शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

मुंडके उडवलेल्या मृतदेहाचे गूढ उलगडले; कवटीतील ‘जॉ फ्रॅक्चर क्लिप’ मुळे आरोपी सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 15:54 IST

गौताळा अभयारण्यातील खून प्रकरणात धक्कादायक खुलासा;दोन जिवलग मित्रांच्या जीवघेण्या झटापटीत एकाने उडवले दुसऱ्याचे मुंडके !

छत्रपती संभाजीनगर : कुजलेल्या अवस्थेत मुंडके उडवलेले धड गौताळा अभयारण्यात आढळले होते. जवळच सापडलेल्या कवटीतील 'जॉ फ्रॅक्चर क्लिप' वरून पोलिसांनी सात दिवसांत मृतदेहाची ओळख पटवून या क्रूर हत्येचा उलगडा केला. निखिल हिरामण सूर्यवंशी (वय २८ रा. सिंदी ता. चाळीसगाव) असे मृ़ताचे नाव असून, त्याचा जिवलग मित्र श्रावण ज्ञानेश्वर धनगर यानेच खून केल्याचे निष्पन्न झाले.

३ सप्टेंबर रोजी गौताळा अभयारण्यात हे शव सापडले. पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या सूचनेवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी पाच पथके तयार करून तपास सुरू केला. सखोल तपासात चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात एका तरुणाच्या बेपत्ता असल्याची नोंद दिसली. पथकाने कुटुंबाशी संपर्क साधल्यानंतर निखिलची ओळख पटली.

'जॉ फ्रॅक्चर क्लिप' आणि एआयच्या मदतीने हत्येचा उलगडाकवटीच्या जबड्यामध्ये एक क्लिप आढळली. पोलिस अधीक्षक डॉ. राठोड यांनी तत्काळ या 'जॉ फ्रॅक्चर क्लिप' ची माहिती घेण्यास सांगितले. सदर क्लिप गुजरातमध्ये तयार होतात. तुटलेल्या हाडांना योग्य जागी स्थिर ठेवण्यासाठी वापरतात.-त्यावरून पोलिसांनी चाळीसगाव, कन्नड, जळगाव, धुळ्यात ३८ रुग्णालयांत भेट देत अशा क्लिप बसवलेल्या रुग्णांची माहिती घेतली.-जुलै, २०२३ मध्ये घोटीच्या एसएमबीटी रुग्णालयात अपघातात जबड्याला दुखापत झाल्याने निखिलवर शस्त्रक्रिया झाल्याचे निष्पन्न झाले. बेपत्ता तरुणाच्या माहितीशी ही बाब जुळली व पोलिस निखिलच्या कुटुंबापर्यंत पोहोचले.

तो मित्र कोण ?निखिल रोजंदारीवर शेतमजुरी करत होता. बकऱ्या चोरून गावात गुंडगिरीही करत होता. श्रावण त्याचा जिवलग मित्र होता. निखिलचे सर्व मित्र पोलिसांसमोर आले. मात्र, श्रावण येत नव्हता. पोलिसांनी त्याच्यावर लक्ष केंद्रित केले. उलट तपासणीत श्रावण गडबडला आणि त्याने हत्येची कबुली दिली. २६ ऑगस्ट रोजी मैत्रिणीला भेटायचे असल्याचे सांगून निखिल त्याला दुचाकीने सायगावमार्गे सनसेट पाॅइंटजवळ घेऊन गेला होता. ‘मी चोऱ्या, गुंडगिरी, व्यसन करतो. तुला माझे सर्व कुकर्म माहिती असल्याने माझी बदनामी होते. तू मेलास तरच माझे लग्न होईल, त्यामुळे तुला मारायचे आहे, असे म्हणत निखिलने त्याच्यावर कुऱ्हाड उपसली. मात्र, श्रावणने वार चुकवत त्याच्या गुप्तांगावर लाथ मारली. तो कोसळताच श्रावणने त्याच कुऱ्हाडीने निखिलचे शीर धडापासून वेगळे केले.

यांनी केली कारवाईउपअधीक्षक डॉ. दिनेशकुमार कोल्हे, पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत, सहायक निरीक्षक संतोष मिसळे, पवन इंगळे, अंमलदार प्रमोद पाटील, वाल्मीक निकम, विठ्ठल डोके, शिवानंद बनगे, अशोक वाघ, गोपाळ पाटील, प्रशांत नांदवे, महेश बिरुटे, समाधान दुबीले, दीपक सुरोसे, बलवीरसिंग बहूरे, योगेश तरमाळे, जीवन घोलप, संजय तांदळे, नीलेश कुडे, कविता पवार, बलवरसिंग बहुरे, प्रमोद पाटील.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर