शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
2
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
4
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
6
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
7
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
8
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
9
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
10
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
11
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
12
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
13
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
14
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
15
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
16
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
17
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
18
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
19
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
20
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! मागील ९ महिन्यांत १० अल्पवयीन मुलींना फूस लावून पळविले; २ बनल्या कुमारी माता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 14:03 IST

एप्रिल महिन्यापासून ते आजपर्यंत घरातून पळून गेलेल्या १० मुलींना पोलिसांनी पकडून बाल कल्याण समितीसमोर हजर केले आहे.

ठळक मुद्दे६ जणींना स्वीकारण्यास घरच्यांचा विरोधआई- वडिलांचा मुलांशी कमी झाला संवाद

औरंगाबाद : अवघ्या १६ वर्षाची ती मुलगी. तिला वाटत होते की, आपल्या मैत्रिणींना बॉयफ्रेंड आहे, तसाच आपल्यालाही असावा. राजकुमाराचे गुलाबी स्वप्न तिला पडू लागले. सोशल मीडियाद्वारे ती गावातील एका मुलाच्या प्रेमात पडली. याची कुणकुण घरच्यांना लागली, अन अचानक ती मुलगी घरातून गायब झाली. ही काही एखाद्या चित्रपटातील किंवा टीव्ही सिरीयलमधील कथा नसून मागील ९ महिन्यात जिल्ह्यात अशा प्रकारे १० अल्पवयीन मुली आभासी प्रेमाच्या जाळ्यात अडकल्या व त्यांना पळवून नेण्यात आले. त्यांचे अज्ञान व प्रेमाचा गैरफायदा घेत २ मुलींच्या भाळी कुमारी मातेचा शिक्का बसला.  

समाजात घडणाऱ्या या वास्तवाची  दाहकता बाल कल्याण समितीकडे येणाऱ्या प्रकरणाच्या आकडेवारीवरून दिसते आहे. एप्रिल महिन्यापासून ते आजपर्यंत घरातून पळून गेलेल्या १० मुलींना पोलिसांनी पकडून बाल कल्याण समितीसमोर हजर केले आहे. तर २ जणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढत  त्यांच्यावर अकाली मातृत्व लादले गेले. या १२ मुली अवघ्या १५ ते १७ वयोगटातील आहेत. पळून गेलेल्यांमध्ये ९ मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकून फूस लावून नेल्याची माहिती समोर आली आहे. बाल कल्याण समितीने या मुलींना बाल संरक्षण गृहात ठेवले आहे. त्यातील ६ मुलींना त्यांच्या पालकांनी घरी नेले पण बाकीच्या मुलींना घरी नेण्यास त्यांचे आई- वडील पुढे आले नाहीत, असे बाल कल्याण समितीचे सदस्य ॲड. मनोहर बनस्वाल यांनी सांगितले. 

मुलगी सुधारली, तर घरी नेतोआमची मुलगी सुधारली असेल तर आम्ही तिला घरी नेतो. मुलगी आमचे ऐकत नाही, आम्ही आमच्या जातीतील चांगल्या मुलासोबत तिचे लग्न लावून देऊ, तिला अनेक चांगले स्थळ येत होते, पण मुलगी त्या टुकार पोरासोबत घरातून पळून गेली. आम्ही कमावलेली इज्जत मातीत मिळविली, असे त्या मुलींच्या पालकांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले. 

आई- वडिलांचा मुलांशी कमी झाला संवादज्या घरात आई- वडिलांचा आपल्या मुलांशी किंवा मुलीशी संवाद तुटतो. पालक आपल्या पाल्याला वेळ देऊ शकत नाही. तेथे या अल्पवयीन मुली आपणास कोणी तरी प्रेमाने बोलावे यासाठी बॉयफ्रेंडचा शोध घेतात. यात काही मुली फसविल्या जातात. असे प्रकार घडू नयेत म्हणून आईने आपल्या मुलीशी मैत्रिणीसारखे वागावे. त्यांना वेळ द्यावा. तसेच  आता मुलांना व मुलींना शाळेतच समुपदेशन करण्याची वेळ आली आहे. - ॲड. ज्योती पत्की, अध्यक्ष, बाल कल्याण समिती

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSocialसामाजिकAurangabadऔरंगाबाद