शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! सासरच्यांकडून अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल झाल्याने जावयाचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 13:54 IST

सासरच्या लोकांनी अमानुष मारहाणीचा व्हिडिओ तरुणाच्या व इतर नातेवाईकांच्या मोबाईलवर शेअर केला.

सिल्लोड ( औरंगाबाद ) : बायकोला नांदवत नाही म्हणून जावयाला सासरच्या लोकांनी बोलावून घेतले. यानंतर जाब विचारून पाईपने अमानुष मारहाण करत त्याच्या गुप्तांगात मिरची पूड टाकल्याची धक्कादायक घटना ८ जुलैला घडली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने जावयाने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी सासरच्या ११ जणांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तालुक्यातील उंडणगाव येथे राहणाऱ्या एका तरुणाचे पत्नीसोबत मतभेद आहेत. त्यामुळे पत्नी बुलढाणा येथील माहेरी असते. मुलीला नांदवत नाही म्हणून सासरच्या लोकांनी जावयाला घरी बोलावून घेतले. यानंतर जाब विचारात सासरच्यांनी वायर, सळईने त्याला बेदम मारहाण केली. यावरच न थांबता त्याच्या गुप्तांगात मिरची पूड टाकून सासरच्यांनी अमानुष मारहाण केली. याप्रकरणी ८ जुलै रोजी सासरच्या ११ लोकांविरुद्ध  बुलढाणा जिल्ह्यात गुन्हे दाखल करण्यात आला. 

यानंतर तरुण उंडणगाव येथे परतला. मात्र, सासरच्या लोकांनी अमानुष मारहाणीचा व्हिडिओ तरुणाच्या व इतर नातेवाईकांच्या मोबाईलवर पाठवला. व्हिडिओ व्हायरल व्होउन बदनामी झाल्याने तरुणाचे मानसिक संतुलन बिघडले. यातूनच उंडणगाव येथे १६ जुलै रोजी त्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सिल्लोड येथील खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याला अधिक उपचारासाठी जुन्नर येथे हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे सिल्लोड तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, तरुणाच्या मामाने सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात ४ जण अटकेत असून इतर ७ फरार आहेत.पोलीस पुढील तपास करत आहेत. अमानुष मारहाण सहन केल्यानंतर व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे तरुण मृत्यूच्या दाढेत उभा असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस