शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! मराठा आरक्षण आंदोलनामुळे मराठवाड्याला पाणी न सोडण्याच्या शासनाच्या सूचना

By स. सो. खंडाळकर | Updated: November 24, 2023 13:51 IST

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता यांनी स्वत:च्या सहीने राज्याच्या जलसंपदा विभागाच्या अपर मुख्य सचिवांना २२ नोव्हेंबर रोजी लिहिलेल्या पत्रातून ही बाब समोर आली आहे.

छत्रपती संभाजीनगर : सद्य:स्थितीत मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू असल्याने निर्माण झालेली कायदा व सुव्यवस्थेची बाब विचारात घेता सध्या पाणी सोडण्याची कार्यवाही पुढील आदेशापर्यंत न करण्याच्या शासनस्तरावरून सूचना आहेत. त्यामुळे पाणी सोडण्याची कारवाई स्थगित ठेवण्यात आली आहे, अशी खळबळजनक बाब आता समोर आली आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात वरच्या धरणांमधून ८.६ टीएमसी पाणी सोडण्याची आशा तूर्त तरी मावळली आहे. इतकी आंदोलने झाल्यानंतरही हा मराठवाड्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया यातून उमटणार आहे.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता स.कों. सब्बीनवार यांनी स्वत:च्या सहीने राज्याच्या जलसंपदा विभागाच्या अपर मुख्य सचिवांना २२ नोव्हेंबर रोजी लिहिलेल्या पत्रातून ही बाब समोर आली आहे. या पत्राच्या प्रती माहितीस्तव संबंधितांनाही पाठवण्यात आल्या आहेत.

काय म्हटले आहे पत्रात...या पत्रात काय म्हटले आहे, हा उत्सुकतेचा भाग आहे. सर्वोच्च न्यायालयात पूर्वी दाखल असलेल्या एसएलपी २१२४१/२०१७मध्ये आयए दाखल करण्यात आली असून याची सुनावणी २१ नोव्हेंबर रोजी झालेली आहे. यात सर्वोच्च न्यायालयाने पाणी सोडण्याच्या निर्णयास कुठेही स्थगिती दिलेली नाही. तसेच, मुंबई उच्च न्यायालयात पीआयएल ३०४२२/२३ दाखल झाली असून याची सुनावणी ७ नोव्हेंबर रोजी होऊन तेथेही या आदेशास स्थगिती दिलेली नाही व पुढील सुनावणी ५ डिसेंबर रोजी आहे. पाणी सोडण्याच्या आदेशाची अद्याप अंमलबजावणी झालेली नसल्याने जायकवाडीच्या धरणाच्या निम्न भागातील लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांची पाणी सोडण्याबाबात आग्रही मागणी होत आहे. गोदावरी महामंडळाच्या कार्यालयावर मोर्चे, आंदोलने करण्यात येत आहेत. यामुळे या कार्यालय परिसरात पोलिस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.

रास्ता रोकोही केला...मराठवाड्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी २० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजेपासून घोषणाबाजीसह रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे महामंडळ कार्यालयासमोरील मुख्य रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. या आंदोलनावर ताबा मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्तही बोलवावा लागला होता. आंदोलकांना ताब्यात घेऊन जिन्सी, चिकलठाणा एमआयडीसी पोलिस ठाण्यात नेल्यानंतर तेथेही ठिय्या आंदोलन करण्यात आले व आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

आंतर स्थगिती अर्ज (आयए) प्रकरणी २१ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी छत्रपती संभाजीनगरच्या लाभक्षेत्र विकास, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक व लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता व प्रशासक उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयात संबंधित वकिलाने काय अभिप्राय दिला हेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.शेवटी, सद्य:स्थितीत मराठा आरक्षण आंदोलनामुळे हे पाणी न सोडण्याच्या शासनस्तरावरून सूचना असल्याचे अधीक्षक अभियंत्यांनी जलसंपदा विभागाच्या अपर मुख्य सचिवांना कळवून माहितीस्तव व पुढील आदेशास्तव म्हटले आहे.

हा तर न्यायालयाचा अवमान....रास्ता रोको आंदोलनाच्या वेळी पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन दिले. २१ नोव्हेंबर रोजी न्यायालयानेही पाणी सोडण्यास कुठलीही स्थगिती दिलेली नाही. तरीही हे घडतंय. हा न्यायालयाचा अवमान होय. मराठवाड्याची जनता आता पेटून उठल्याशिवाय राहणार नाही.- अनिल पटेल, मुख्य संयोजक, मराठवाडा जलआंदोलन समिती.

कालच पदभार घेतला...लोकमत प्रतिनिधीने अधीक्षक अभियंता स.कों. सब्बीनवार यांना विचारले असता, त्यांनी मी कालच पदभार घेतला आहे. मला यातलं फारसं माहीत नाही’ असे म्हणत कानावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांचे वरिष्ठ तिरमनवार यांना संपर्क साधला असता, त्यांनी, सॉरी, आय कांट राइट नाऊ, असा मेसेज पाठवला.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीState Governmentराज्य सरकारNashikनाशिकAhmednagarअहमदनगरMaratha Reservationमराठा आरक्षण