शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

धक्कादायक ! ३० वर्षांत चार हजार मातृभाषा संपुष्टात  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 14:27 IST

सध्या जणू भाषा नष्ट करण्याची लाट आलेली आहे

ठळक मुद्देजनगणना यंत्रणेमुळे भाषांचा लोपभाषा टिकवून ठेवण्यापेक्षा मारून टाकायला लोक आतुर झालेले आहेत.

औरंगाबाद : ‘जगात सुमारे सहा हजार मातृभाषा आहेत. त्यापैकी येत्या ३० वर्षांत चार हजार भाषा मरतील, संपुष्टात येतील. उरलेल्या दोन हजारपैकी सतराशे भाषा हात-पाय तोडलेल्या अवस्थेत राहतील व जेमतेम तीनशे भाषा शिल्लक राहण्याची शक्यता आहे’ असा धोका आज येथे विवेकानंद व्याख्यानमालेत प्रख्यात भाषाशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केला. 

विवेकानंद महाविद्यालयाच्या प्रांगणात ‘भारतीय भाषांचे भवितव्य’ या विषयावर ते बोलत होते. प्रारंभी, पाहुण्यांच्या हस्ते विवेकानंद व कै. पंढरीनाथ पाटील ढाकेफळकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. मंचावर विवेकानंद शिक्षणसंस्थेचे कोषाध्यक्ष तुषार शिसोदे व सहसचिव डॉ.यशोद पाटील यांची उपस्थिती होती. प्राचार्य श्याम शिरसाट यांनी प्रास्ताविक केले. सुरेखा देवी, संदेश भंडारे, न्या. नरेंद्र चपळगावकर व प्राचार्य प्रताप बोराडे यांचे यावेळी दादाराव शेंगुळे, डॉ. अशोक गायकवाड, प्रभाकर मोरे, शुभांगी गोडबोले यांनी स्वागत केले. प्रा. मेघा गोरे यांनी सूत्रसंचालन केले व आभारही मानले. 

डॉ.  देवी म्हणाले की,भाषा वैविध्य जगवावंच लागेल. मातृभाषा वाचवणं, बोलणं, जपणं, त्यातील स्मृती पुढे नेणे, करुणामय सरकारे निर्माण करणे, हाच मार्ग होय व हेच आपले कर्तव्य होय. मी पृथ्वीचा पुत्र आहे. पृथ्वी माझ्या मालकीची नाही. स्मृती परंपरांना योग्य ते स्थान देऊन पृथ्वीवरच स्वर्ग कसा निर्माण करता येईल, हे बघणे महत्त्वाचे होय. विस्मृतीत चाललेले हे जग, स्मृतीवर अत्याचार करणारे हुकूमशाही पद्धतीची सरकारे याबद्दल देवी यांनी चिंता व्यक्त केली. आज संपूर्ण जग स्मृतिहीन होत आहे. कृत्रिम स्मृती वाढवून स्वत:ची स्मृती, शक्ती कमी केली जात आहे. जणू काळाबरोबर आपण वैर पत्करलंय. जगभर घाई झाली आहे. ऊर्जा, गती मिळवणं म्हणजे प्रगती होय, असे मानले जात आहे, असे ते म्हणाले.

जनगणना यंत्रणेमुळे भाषांचा लोपडॉ. देवी यांनी भाषांचा लोप जनगणना यंत्रणेमुळे होत आहे, असे स्पष्ट केले. २०११ च्या जनगणनेत ३६०० मातृभाषांची नावे पुढे आली. उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमधील ५ कोटी २० लाख जनता भोजपुरी बोलते. परंतु सेन्ससने भोजपुरी ही हिंदीची पोटभाषा दाखविली. एकूण ६१ भाषा  हिंदीत मिसळून  या भाषांचं अस्तित्व सेन्ससनं नष्ट केलं. भाषा टिकवून ठेवण्यापेक्षा मारून टाकायला लोक आतुर झालेले आहेत. सध्या जणू भाषा नष्ट करण्याची लाट आलेली आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादliteratureसाहित्यSocialसामाजिक