शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! विवाह जुळत नसल्यामुळे नैराश्यातून शेतकरी तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 18:02 IST

सगळ्या गोष्टी योग्य, पण मुलगा शेती व्यवसायात.

ठळक मुद्दे शेतकरी कुटुंबात कोणी मुलगी द्यायला धजावत नाही.

लासूर स्टेशन : शेती व्यवसायाची अवस्था वाईट झाल्याने शेतकरी कुटुंबात कोणी मुलगी द्यायला धजावत नाही. परिणामी शेतकरी तरुणाचे लग्नच जुळत नाही.   लग्नासाठी मुलगी मिळत नसल्यामुळे    डोमेगाव (ता. गंगापूर)  येथील शेतकऱ्याचा ३२ वर्षीय मुलगा बापूराव कडू सोलनकर याने गळफास घेऊन आत्महत्या केली. 

सोमवारी सकाळी ८.३० वाजता ही दुर्दैवी घटना उघडकीस आली. शिल्लेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. येसगाव डिघी रस्त्यावर डोमेगाव शिवारातील एका चिंचेच्या झाडाला तरुणाने गळफास लावल्याचे काही ग्रामस्थांनी पाहिले. त्यांनी गावात माहिती दिली. पोलीस पाटलांनी शिल्लेगाव पोलिसांना कळविले.  तो डोमेगाव येथील शेतकरी कडू सोलनकर यांचा मुलगा बापूराव सोलनकर असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी बापूरावचा देह  शासकीय रुग्णालयात दाखल केला. काल बापूरावचे वडील, आई आणि भाऊ नातेवाईकाकडे गेले होते, तो एकटाच घरी होता. मध्यरात्री नैराश्येतून त्याने गळफास घेतल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 

कडू सोलनकर यांना तीन मुले. एकरभर बागायती शेतीच्या भरवशावर ते कुटुंबाचा गाडा नेटाने हाकत आले. याचबरोबर कडू सोलनकर व त्यांची पत्नी मोलमजुरीही करतात. लग्नानंतर मोठा मुलगा वेगळा झाला. बापूराव शेतात राबून बांधकाम मजूर म्हणूनही काम करीत होता. लहान भाऊ कुटुंबाला हातभार लावण्यासाठी बकऱ्या सांभाळतो. मुलगा बापूराव विवाहयोग्य झाल्याने नातेवाईकांनी स्थळांबाबत चौकशी करायला सुरुवात केली. सगळ्या गोष्टी योग्य, पण मुलगा शेती व्यवसायात. आणि शेती व्यवसाय तर मोठा अडचणीत. वयाची ३२ वर्षे पूर्ण झाली, तरी विवाहसंबंध जुळत नव्हते. कमी जमीन, त्यात तिघे भाऊ. त्यामुळे मुलीचे स्थळ त्याच्यासाठी येत नव्हते, ही चिंता कायम सतावत होती.

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्याagricultureशेतीAurangabadऔरंगाबाद