शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! पॅरोलवर सोडण्यासाठी कैद्याच्या मुलास दोन लाखांची मागणी; थेट जेलमधून गेला कॉल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 15:07 IST

कारागृहात मोबाईल वापरण्यास मनाई आहे, असे असताना एका अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून तेथील एका जेलरचा मोबाईल लॉकरमधून काढून त्यावरून कॉल करण्यात आले.

ठळक मुद्देकारागृह अधीक्षक यांना कैद्यांना पॅरोल मंजूर करण्याचा अधिकारअप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांचे चौकशीचे आदेश

औरंगाबाद :  खुनाचा आरोप असलेल्या कैद्याला पॅरोलवर सोडण्यासाठी हर्सूल  मध्यवर्ती कारागृहातून २ लाख रुपयांची मागणी करणारा कॉल कैद्याच्या मुलाला केल्याची धक्कादायक माहिती  नुकतीच समोर आली. या घटनेची गंभीर दखल घेत अपर पोलीस महासंचालक (जेल) यांनी उपमहानिरीक्षक दिलीप झळके यांच्याकडे चौकशी सोपविल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शासनाने एप्रिल महिन्यात पहिल्या टप्प्यात ७ वर्षांपेक्षा कमी शिक्षेच्या कैद्यांना वैयक्तिक जातमुचलक्यावर जेलमधून सोडण्याचा निर्णय घेतला.  यानंतर मोक्का आणि बॉम्बस्फोटांतील कैद्यांना वगळून जे कैदी यापूर्वी पॅरोल अथवा फर्लो रजेवर जाऊन जेलमध्ये परत आले त्यांना प्रथम ४५ दिवसांसाठी पॅरोलवर सोडण्याचा निर्णय झाला. या निर्णयानुसार  कारागृह अधीक्षक यांना कैद्यांना पॅरोल मंजूर करण्याचा अधिकार देण्यात आला होता. यादरम्यान बिडकीन येथील खुनाच्या कैद्याला पॅरोलवर सोडण्यासाठी त्यांच्या मुलाच्या मोबाईलवर कॉल करून  २ लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचे  विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. 

कारागृहात मोबाईल वापरण्यास मनाई आहे, असे असताना एका अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून तेथील एका जेलरचा मोबाईल लॉकरमधून काढून त्यावरून कॉल करण्यात आले. वाळूजमध्ये झालेल्या एका खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये असलेल्या कैद्याने यासाठी पुढाकार घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. या कैद्यानेच  बिडकीन येथील मुलाकडे पैशाची मागणी केली. कैद्याच्या मुलाने २ लाख रुपये ही रक्कम  त्याच्याकडे नसल्याचे सांगितल्यावर वडिलांसाठी ही रक्कम कमी सांगितल्याचे तो म्हणाला. दीड मिनिटाचे हे संभाषण असल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत माहिती मिळताच अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी चौकशी करण्याचे झळके यांना दिले.  हर्सूल जेलचे अधीक्षक हिरालाल जाधव यांनी मात्र याविषयी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादjailतुरुंग