शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! बंद शाळाही शासन अनुदानाच्या यादीत, शैक्षणिक वर्तुळात खळबळ

By विजय सरवदे | Updated: April 25, 2023 13:08 IST

वरिष्ठ पातळीवरूनच यादीत नावे घुसविल्याचा संशय

छत्रपती संभाजीनगर : मागील दहा-बारा वर्षांपासून अनेक शाळा अनुदानाच्या प्रतीक्षेत मेटाकुटीला आल्या, तरीही त्या अखंडपणे ज्ञानदानाचे कार्य नेटाने पार पाडत आहेत. दुसरीकडे मात्र, चक्क बंद असलेल्या काही शाळा अनुदानाच्या यादीत झळकल्याचे पाहून शिक्षण विभाग खडबडून जागा झाला असून, या शाळा अनुदानास अपात्र असल्याचा अहवाल तातडीने शासनाकडे पाठविला आहे. 

ज्या शाळांचे अनुदान मूल्यांकनासाठी प्रस्ताव प्राप्त होतात, अशाच शाळांच्या प्रस्तावानुसार जिल्हास्तरीय मूल्यांकन समिती स्थळ पाहणी करून कागदपत्रे आणि वस्तुस्थितीची खातरजमा करीत असते. यामध्ये शाळांत विद्यार्थिसंख्या, शिक्षकसंख्या, वर्गखोल्यांची संख्या व इतर पायाभूत व शैक्षणिक सुविधांची तपासणी केली जाते. सन २०१४-१५ आणि २०१५-१६ मध्ये जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीने अघोषित शाळांची तपासणी केली होती. पात्र शाळांचा अहवाल या समितीकडून शिक्षण उपसंचालक कार्यालयात सादर केला जातो. तेथे अहवालाची बारकाईने तपासणी करून नंतर शिक्षणाधिकाऱ्यांच्या शिफारसींना सहमती दर्शवून पात्र शाळांचे प्रस्ताव शिक्षण संचालक कार्यालयाकडे सादर केला जातो. तेथेही प्रस्तावांची बारकाईने छाननी करून मगच अनुदानासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला जातो. त्यानंतर शासनाकडून अनुदानासाठी पात्र शाळांची यादी जाहीर केली जाते. एवढी सारी चाळणी असतानादेखील बंद असलेल्या जिल्ह्यातील या चार-पाच शाळा अनुदानाच्या यादीत आल्यामुळे शैक्षणिक वर्तुळात उलटसुलट चर्चेला वेग आला आहे.

आम्ही सावध आहोतदरम्यान, अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शाळांनी शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर केलेले आहेत. यादीतील शाळांच्या कागदपत्रांची बारकाईने तपासणी केली आहे. विद्यार्थिसंख्येची माहिती घेतलेली आहे. मात्र, ‘त्या’ शाळांकडून अद्याप अनुदान मागणीचा प्रस्ताव आलेला नाही. दुसरीकडे, शाळांची संचमान्यता झाल्यानंतरच अनुदान देण्यात येईल. आम्ही सावधपणे सर्व बाजूंची खातरजमा करत आहोत.

सारेच प्रश्न अनुत्तरितया शाळा बंद असताना त्यांचे मूल्यांकन केले कोणी? शिक्षण उपसंचालक, शिक्षण संचालक कार्यालयात प्रस्तावाची छाननी झाली नाही का? तेथून शासनाकडे अनुदानासाठी शिफारस करण्यात आली की थेट शासनस्तरावरूनच या शाळांची नावे अनुदानाच्या यादीत घुसवण्यात आली? एकंदरीत सारेच प्रश्न अनुत्तरित आहेत.

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळाAurangabadऔरंगाबाद