शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! गावातील रस्ता बंद केल्यावरून मागासवर्गीय दाम्पत्यास वाळीत टाकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 19:26 IST

पीडित कुटुंबाने सिल्लोड ग्रामीण पोलीस व मानवी हक्क आयोगाकडे मंगळवारी तक्रार केली आहे.

सिल्लोड : तालुक्यातील वांजोला येथील एका मागासवर्गीय दाम्पत्याला गावातील रस्ता बंद केल्याच्या कारणावरून उपसरपंच व इतरांनी वाळीत टाकल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी पीडित कुटुंबाने सिल्लोड ग्रामीण पोलीस व मानवी हक्क आयोगाकडे मंगळवारी तक्रार केली आहे.

सिल्लोड तालुक्यातील वांजोला येथील दीपक म्हातारजी सुरडकर (वय ६५ वर्षे) व कडूबाई दीपक सुरडकर (वय ६० वर्षे) व त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांच्या घराशेजारचा रस्ता चारी खोदून बंद केला आहे. त्यामुळे तेथून इतर ग्रामस्थांना शेतात जाण्यास अडचण होत आहे, असे कारण देऊन २६ जून रोजी गावात दवंडी देऊन, सुरडकर परिवारास गावातील उपसरपंच रमेश काकडे व सुरडकर यांच्या भावकीतील व्यक्तींनी वाळीत टाकले.

त्यांच्या परिवारासोबत कोणीही बोलू नये, त्यांच्या घरी कोणीही जाऊ नये, त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारचे समाजिक संबंध ठेवू नयेत, त्यांना बौद्ध विहारामध्ये प्रवेश देऊ नये, कुठल्याही दुकानातून सामान देऊ नये किंवा गावातील कुठल्याही व्यक्तींनी त्यांच्यासोबत कुठल्याही प्रकारे व्यवहार करू नये, असे दवंडी देऊन गावात कळविल्याचा आरोप दीपक सुरडकर यांनी दिलेल्या तक्रारीत केला आहे. ही घटना २६ जून रोजी घडली होती. त्यानंतर, सर्व सुरळीत होईल, असे वाटत असल्याने तक्रार दिली नव्हती. मात्र, त्रास वाढल्याने २६ जुलै रोजी सिल्लोड ग्रामीण पोलीस, पोलीस अधीक्षक व मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केल्याचे सुरडकर म्हणाले. त्यांनी दिलेल्या तक्रारीत उपसरपंच रमेश अर्जुन काकडे यांच्यासह १८ जणांची नावे आहेत.

तक्रारच आलेली नाही...गावात रस्त्यावरून काही वाद झाले होते. मात्र, त्या कुटुंबाला कुणी वाळीत टाकले, याची आमच्याकडे अजून तरी तक्रारच आलेली नाही. तक्रार आली, तर चौकशी केली जाईल.- सीताराम मेहेत्रे, पोलीस निरीक्षक सिल्लोड ग्रामीण.

गावाच्या रस्त्याचा वाद आहेया इसमाने गावकऱ्यांचा रस्ताच चारी खोदून बंद केला होता. तो ग्रामपंचायतीमार्फत मोकळा करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनी बदला घेण्यासाठी खोटी तक्रार केली आहे.- रमेश काकडे उपसरपंच धानोरा-वांजोला ग्रुप ग्रामपंचायत.

शेतात राहतो..आम्ही गावाबाहेर शेतात राहतो. रस्त्याचा काही वाद नाही. त्यांनी माझ्या घरातूनच रस्ता काढला आहे. बोलायला गेलो, तर वाळीत टाकले आहे. याबाबत पोलिसांकडे एक महिन्यापासून तक्रार दाखल करण्यासाठी चकरा मारत आहे, परंतु दखल घेतली जात नाही. त्यामुळे आता मानवी हक्क आयोग व पोलिसांना पोस्टद्वारे तक्रार पाठविली आहे.- दीपक म्हातारजी सुरडकर, पीडित.

हा तर गंभीर गुन्हा...असा प्रकार जर झाला असेल, तर हा गंभीर गुन्हा आहे. याबाबत पोलीस निरीक्षक यांच्याशी तत्काळ चर्चा करून कार्यवाही करण्यास सांगतो व जिल्हाधिकाऱ्यांनाही याबाबत माहिती देण्यात येईल. दोषींवर कठोर कारवाई होईल.- विक्रम राजपूत, तहसीलदार, सिल्लोड.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदा