शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

धक्कादायक! आरक्षणासाठी जीवन संपवलेल्या आंदोलकाच्या नातेवाइकास दिलेला चेक झाला बाउन्स

By बापू सोळुंके | Updated: November 3, 2023 15:31 IST

कुटुंबीयाला शासनाने दिलेला दहा लाख रुपयांचा धनादेश अनादर झाल्याची धक्कादायक बाब समोर आली

छत्रपती संभाजीनगर: आपातगाव येथील मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या गणेश कुबेर यांच्या कुटुंबीयाला शासनाने दिलेला दहा लाख रुपयांचा धनादेश अनादर झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. धनादेशावरील स्वाक्षरी अधिकृत नसल्याचा शेरा मारून हा चेक बँकेने न वटता परत पाठवल्याचे कुबेर यांच्या नातेवाईकांनी सांगितले. 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी २६ ऑक्टोबर रोजी गणेश काकासाहेब कुबेर यांनी आपतगाव येथील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती या घटनेनंतर संतप्त जमावाने तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या. वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करा,मृताच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्या आणि मयताच्या वारसाला शासकीय नोकरी द्या, अशी मागणी करण्यात आली होती. तसेच ही मागणी मान्य न झाल्यास मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका त्यावेळी गावकऱ्यांनी घेतली होती . 

यावेळी सामाजिक कार्यकर्ते अभिजीत देशमुख आणि इतरांनी मध्यस्थी करून शासनाची 10 लाखाची मदत या कुटुंबाला मिळवून दिली होती. मात्र, मृताची पत्नी उर्मिला कुबेर यांना दिलेला दहा लाख रुपयांचा धनादेश बँकेने न वाटता परत पाठवण्याची बाब आज समोर आली. मृताचा भाऊ भरत कुबेर यांनी याविषयी लोकमतला सांगितले की, धनादेश बँकेत टाकण्यापूर्वी आणि नंतरही यांच्याशी संपर्क मात्र त्यांनी आमचे फोन घेतले नाही.

संबंधित अधिकाऱ्यास निलंबित करामराठा आरक्षणावरून सतत मराठा समाजाची थट्टा करणाऱ्या राज्य सरकारने मयत तरुणांच्या कुटुंबीयांना दिलेल्या मदतीचे धनादेशही अनादर केले राज्य सरकार आणखी किती मराठा समाजाची थट्टा करणार असा प्रश्न सामाजिक अभिजीत देशमुख यांनी उपस्थित केला चेक बाउन्स करणाऱ्या तहसीलदारावर निलंबनाची कारवाई करावी आणि संबंधित कुटुंबा च्या बँक खात्यात सदर रक्कम आरटीजीएस करावी अशी मागणी त्यांनी केली

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबाद