शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! वृद्धाची राहत्या घरात भोसकून हत्या; पाठ, पोटावर क्रूरतेने वार

By सुमित डोळे | Updated: April 16, 2024 15:14 IST

महावितरणमधून सेवानिवृत्त झालेले पाटील सातारा परिसरातील चाटे स्कूल परिसरात कुटुंबासह राहत

छत्रपती संभाजीनगर :  सातारा परिसरात ६२ वर्षीय वृद्धाची क्रूर हत्या झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी ७.३० वाजता निदर्शनास आली. श्रीकृष्ण वामन पाटील असे हत्या झालेल्या वृध्दाचे नाव आहे. 

महावितरणमधून सेवानिवृत्त झालेले पाटील सातारा परिसरातील चाटे स्कूल परिसरात सिल्व्हर रेसिडेन्सीमध्ये पत्नी, मुलगा व लहान मुलीसह वास्तव्यास होते. सोमवारी कुटुंबासोबत जेवण करून सर्व सदस्य झोपी गेले. मंगळवारी सकाळी ७.३० वाजता मात्र पाटील धक्कादायकरीत्या घरात मृतावस्थेत आढळले. सातारा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच उपायुक्त नवनीत काँवत, सहायक आयुक्त डॉ. रणजित पाटील, गुन्हे शाखेचे संदीप गुरमे, सहायक निरीक्षक काशिनाथ महांडूळे, साताऱ्याचे निरीक्षक ब्रह्मा गिरी, उपनिरीक्षक दिलीप बचाटे, अमोल कामठे, नंदकुमार भंडारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा पाटील यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्यांच्या पोट व पाठीवर टोकदार शस्त्राने वार केल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून आले. पाटील यांचा मृतदेह घाटी रुग्णालयातील शवविच्छेदन विभागाकडे पाठवण्यात आला. 

गंभीर प्रश्न उपस्थित, तपास सुरूचार खोल्यांच्या रोहाऊसमध्ये पाटील यांचे कुटुंब राहते. त्यांच्या एका मुलीचे लग्न झाले आहे. पत्नी, मुलगा, मुलगी घरात असताना पाटील यांची हत्या झाली कशी? कोणालाच त्यांच्या ओरडण्याचा आवाज कसा आला नाही? असे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिसांनी तत्काळ पाटील यांच्या जवळच्या नातेवाईकांना ताब्यात कसून चौकशी सुरू केली. सायंकाळ पर्यंत घटनेचा उलगडा होईल, असेही सातारा पोलिसांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद