शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादला दुहेरी धक्का ! कोरोनाचा १८ वा बळी, आणखी ७ पॉझिटिव्हसह रुग्णसंख्या ६८४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 18:35 IST

एकाच दिवसात तीन मृत्यू आणि ३१ पॉझिटिव्ह असा दुहेरी धक्का बुधवारी शहरवासियांना बसला आहे. 

ठळक मुद्देशहरात पाच नवीन हॉटस्पॉटआरटीओ कार्यालयाची खबरदारी

औरंगाबाद : शहरात कोरोनाचा १८ वा बळी गेला असून सिल्कमील कॉलनी येथील एका ६५ वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला आहे. तसेच बुधवारी सकाळी २४ पॉझिटिव्ह रुग्णांचे निदान झाल्यानंतर सायंकाळी आणखी ७ पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे एकूण कोरोना बाधितांची संख्या आता ६८४ झाली आहे. एकाच दिवसात तीन मृत्यू आणि ३१ पॉझिटिव्ह असा दुहेरी धक्का बुधवारी शहरवासियांना बसला आहे. 

शहरात कोरोनाबाधित दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचे बुधवारी सकाळी समोर आले. बीड बायपास परिसरातील अरुणोदय कॉलनीतील ९४ वर्षीय वृद्धेचा आणि गारखेडा परिसरातील हुसैन कॉलनीतील ५८ वर्षीय महिलेचा मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर सायंकाळी एका कोरोनाबाधीताचा मृत्यू झाल्याचे पुढे आले. सिल्कमिल कॉलनी येथील एका ६५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली. या महिलेला मंगळवारी खाजगी रूग्णालयातून घाटीत रेफर करण्यात आले होते. उपचार सुरू असताना बुधवारी पहाटे ४ वाजता महिलेचा मृत्यू झाल्याचे डॉ. गायकवाड यांनी सांगितले. या तीन  मृत्यूमुळे शहरात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या आता १८ झाली आहे. दरम्यान, सायंकाळी आढळून आलेल्या ७ रुग्णांत जयभवानीनगर येथील ४, सिल्कमिल कॉलनी , सातारा परिसर आणि कैलासनगर येथील प्रत्येकी  एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातर्फे देण्यात आली.

आरटीओ कार्यालयाची खबरदारीआरटीओ कार्यालयाच्या परिसरात एका रुग्णाचे निदान झाले. त्यामुळे आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे. खबरदारी म्हणून कर्मचाऱ्यांना कार्यालयात येऊ नये, ऑनलाईन पद्धतीने काम करण्याची सूचना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार यांनी दिली.

पाच नवीन हॉटस्पॉटहुसैन कॉलनी, गारखेडा परिसरातील विजयनगर, जय भवानी नगर, रहेमानिया कॉलनी आणि अरुणोदय कॉलनी या पाच हॉटस्पॉटची शहरात भर पडली आहे. त्याबरोबर नंदनवन कॉलनीच्या परिसरातील अन्य भागांतही कोरोनाने शिरकाव केला आहे. 

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू