शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना, काँग्रेसने काढले भापला चिमटे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 22:39 IST

राज्यातील भाजप सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. त्यामुळे मंगळवारी सर्वसाधारण सभेत शासनाच्या अभिनंदनाचा ठराव भाजपने ठेवला. भाजपला घायाळ करण्यासाठी दुसऱ्या क्षणाला शिवसेना, काँग्रेस नगरसेवकांनी पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांच्या मुद्यावर विजयी पक्षांच्या अभिवनंदनाचा ठराव आणला. दोन्ही ठराव महापौरांनी मंजूर केले.

औरंगाबाद : राज्यातील भाजप सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. त्यामुळे मंगळवारी सर्वसाधारण सभेत शासनाच्या अभिनंदनाचा ठराव भाजपने ठेवला. भाजपला घायाळ करण्यासाठी दुसऱ्या क्षणाला शिवसेना, काँग्रेस नगरसेवकांनी पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांच्या मुद्यावर विजयी पक्षांच्या अभिवनंदनाचा ठराव आणला. दोन्ही ठराव महापौरांनी मंजूर केले. यावेळी भाजप नगरसेवकांना जोरदार चिमटे काढण्याची संधी दोन्ही पक्षांनी सोडली नाही.मंगळवारी सकाळी सर्वसाधारण सभेला सुरूवात होताच मराठा समाजाला नुकतेच आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. सरकारच्या अभिनंदनाचा ठराव भाजपतर्फेच मांडण्यात आला. त्याला भाजपच्याच बहुतांश नगरसेवकांनी अनुमोदन दिले. काँग्रेसनेही आरक्षण सहजासहजी मिळालेले नाही, त्यासाठी ४५ जण हुतात्मा झाले, त्यानंतर शासनाला जाग आली, अशी बोचरी टीका करीत ठरावाला अनुमोदनही दिले. शिवसेनेने मराठा आरक्षणासोबत शासनाने इतरही बरीच आश्वासने दिली होती. ती अद्याप पूर्ण झाली नाहीत. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे, आर्थिक मदत यांसह इतर आश्वासने पूर्ण झाल्यानंतरच अभिनंदन करण्यात यावे, असा टोला मारण्यात आला. भाजप नगरसेवकांना घायाळ केल्यानंतर लगेच काँग्रेस नगरसेवकांनी पाच राज्यांच्या निवडणूकांमध्ये काँग्रेसला घवघवीत यश मिळत आहे. राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचे अभिनंदन करण्याचा ठराव मांडला. त्यावर भाजप नगरसेवकांनी अद्याप बहुमत नाही, पुढे काय होतेय ते पहा... असे सांगत ठरावाची खिल्ली उडविण्याचा प्रयत्न केला. अखेर महापौैरांनी सर्व ठराव मंजूर केले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाPoliticsराजकारणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका