शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
2
"प्रभू श्रीराम सगळ्यांचे... मी दलित म्हणून मला बोलवलं नाही"; अयोध्या खासदाराचा नाराजीचा सूर
3
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
4
Ahilyanagar: मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून बेदम मारहाण!
5
Apple नंतर ही कम्प्युटर बनवणारी 'ही' दिग्गज कंपनी ६००० कर्मचाऱ्यांची कपात करणार, का घेतला हा मोठा निर्णय?
6
१० वर्षांत १ कोटींचा टप्पा गाठायचा आहे? SIP द्वारे कोणत्या फंडात आणि किती गुंतवणूक करणे फायदेशीर!
7
महालक्ष्मी व्रतकथा: महालक्ष्मी व्रत कथेशिवाय पूजा अपूर्ण; पती-पत्नीने मिळून वाचल्यास मिळते अधिक फळ!
8
घटस्फोट, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणानंतर सेलिना जेटलीची पहिली पोस्ट; म्हणाली, "माझी मुलं..."
9
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
10
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
11
मार्गशीर्षातला पहिला गुरुवार, महालक्ष्मी व्रताची तयारी झाली का? वाचा साहित्य आणि पूजाविधी
12
गरिबांसाठीच्या योजनांवर १ लाख कोटी रुपयांचा खर्च; लोककल्याणाचा उदात्त हेतू, पण सरकारी तिजोरीवर वाढता ताण
13
Stock Market: ३ दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २४५ अंकांनी वधारला; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
14
टीम इंडियाची लाजिरवाणी कामगिरी! स्टार क्रिकेटर म्हणाला, 'ही' आमच्यासाठी विन-विन सिच्युएशन ठरेल!
15
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
16
पेन्शन, टॅक्स पासून एलपीजी पर्यंत; १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम
17
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
18
देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा?
19
धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
20
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
Daily Top 2Weekly Top 5

बॉम्बच्या निनावी कॉलनंतर शिवनेरी बसची तपासणी ; औरंगाबादमध्ये खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2017 18:10 IST

माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग एका कार्यक्रमानिमित्त शहरात आलेले असताना पुण्याहून प्रवाशी घेऊन शहरात दाखल होत असलेल्या एस.टी. महामंडळाच्या शिवनेरी बसमध्ये बॉम्ब असल्याचा फोन पोलीस नियंत्रण कक्षाला प्राप्त होताच खळबळ उडाली.

ठळक मुद्दे एस.टी. महामंडळाच्या शिवनेरी बसमध्ये बॉम्ब असल्याचा फोन पोलीस नियंत्रण कक्षाला प्राप्त होताच खळबळ उडाली.बीडीडीएस पथकाने कर्णपुरा येथील मैदानावर बस नेऊन तपासणी केली  

औरंगाबाद: माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग एका कार्यक्रमानिमित्त शहरात आलेले असताना पुण्याहून प्रवाशी घेऊन शहरात दाखल होत असलेल्या एस.टी. महामंडळाच्या शिवनेरी बसमध्ये बॉम्ब असल्याचा फोन पोलीस नियंत्रण कक्षाला प्राप्त होताच खळबळ उडाली. छावणीतील लोखंडी पुलावर बस अडवून कर्णपुरा येथील मैदानावर नेण्यात आली. बॉम्ब शोधक आणि नाशक(बीडीडीएस)पथकाने बसमधील प्रत्येक प्रवाशांसह बसची कसून तपासणी केली तेव्हा बॉम्बची अफवाच असल्याचे निष्पन्न झाले आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. 

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, माजी कृषीमंत्री शरद पवार हे एका कार्यक्रमानिमित्त शहरात आलेले असताना पुण्याहून शहरात दाखल होत असलेल्या शिवनेरी बसमध्ये (क्रमांक एमएच-्र६ एस ९३८७)बॉम्ब असल्याचा फोन पोलीस नियंत्रण कक्षाला ३ वाजेच्या सुमारास प्राप्त झाला. या कॉलची माहिती पोलीस आयुक्तांसह सर्व पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि बीडीडीएस पथकाला देण्यात आली. छावणी पोलीस, वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकारी-कर्मचार्‍यांनी छावणीतील लोखंडी पुलावर शिवनेरी बस अडविली आणि बसचालकास गाडी थेट कर्णपुरा येथील मोकळ्या जागेत उभी करण्याचे सांगितले. यानंतर पोलिसांच्या मोठ्या ताफ्याने बसला घेराव घातला.

प्रथम सर्व प्रवाशांना बसमूधन उतरून त्यांची तपासणी करण्यात आली. यानंतर बीडीडीएसचा स्फोटक शोधक  श्वान आणि मेटल डिटेक्टरने बसची कसून तपासणी करण्यात  आली. प्रवाशांचे सर्व सामान आणि पार्सलची तपासणी करण्यात आली. या तपासणीत बसमध्ये कोणतीही आक्षेपार्ह आणि संशयास्पद वस्तू न आढळल्याने सर्वांनी सुटकेचा सुसकारा सोडला.  कुणीतरी खोडसाळपणाने पोलिसांना हा कॉल केल्याचे निष्पन्न झाले. 

बसस्थानकावरील बसेसची तपासणी

कर्णपुरा येथे बसच्या तपासणीत काहीही नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर बीडीडीएसच्या पथकाने मध्यवर्ती बसस्थानक येथे जाऊन अन्य शिवनेरी आणि अश्वमेध बसेसची तपासणी सुरू केली. शिवाय साध्या वेशातील अधिकारी बसस्थानकावरील संशयास्पद वस्तू आणि व्यक्तींवर नजर ठेवून होते. 

पोलीस उपयुक्त डॉ. दिपाली धाटे- घाडगे यांनी या विषयी सांगितले कि, पोलीस नियंत्रण कक्षाला अनोळखी व्यक्तीने कॉल करून आम्ही शिवनेरी बस मध्ये बॉम्ब ठेवला आहे असे कळवले. या कॉलची गंभीर दखल घेऊन तपासणी केली असता त्यात तथ्य आढळले नाही. 

गुन्हा दाखल होणार पोलिसांना निनावी कॉल करून खोटी माहिती देणा-याचा आम्ही शोध सुरु केला, त्याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात येत आहे.  

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद