शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिवना-मादनी येथील नुकसानीची महसूल पथकाकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 18:51 IST

पर्जन्यमापक यंत्र नसल्याने शासनाकडे अतिवृष्टीची नोंद नाही

सिल्लोड (औरंगाबाद ) : शिवना-मादनी परिसरात पावसामुळे झालेल्या नुकसानीची स्थळ पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी संबंधित तलाठी व मंडल अधिकारी यांना दिले आहेत. नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी करून त्याचा अहवाल शासनाला तात्काळ पाठवणार असल्याचे उपविभागीय अधिकारी पांडुरंग कुलकर्णी यांनी लोकमतला सांगितले.

तालुक्यातील शिवना व मादनी परिसरात मंगळवारी रात्री अतिवृष्टि झाली. त्यात बुलढाणा अजिंठा रस्ता दोन दिवसांपासून बंद होता. या परिसरातील हजारो हेक्टर शेतजमीन, पीके वाहून गेली. नुकसानीची दखल घेवून तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी स्थळ पाहणी अहवाल देण्याच्या सूचना संबंधित तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना दिल्या. आज मादनी शिवारातील 70 व खुपटा शिवारातील 60 असे 130 शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीची पाहणी तलाठी विजय शेळके, कृषी सहायक अजीत वळवी यांनी केली. त्याचा अहवाल तहसीलदारांना देण्यात आला. 

पावसाची शासकीय नोंद नाही शिवना व मादनी परिसरात 65 मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, येथे अतिवृष्टि झाली नसल्याचा दावा प्रशासन करीत आहे. शिवाय शिवना व मादनी येथे पर्जन्यमापक यंत्र नाही यामुळे शासनाकडे कुठलीच नोंद नाही. 

शिवना, मादनी परिसरात अतिवृष्टि झाल्याची नोंद सरकारी दप्तरांत नाही, यामुळे नुकसानीचे पंचनामे करता येत नाहीत. या परिसरात प्रचंड नुकसान झाले हे बरोबर आहे. तलाठी, मंडल अधिकारी यांना अहवाल देण्यास सांगितले आहे. नुकसानीचा सविस्तर अहवाल शासनास देण्यात येईल.- रामेश्वर गोरे तहसीलदार सिल्लोड.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागRainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद