शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

'शिवाजी महाराज तर जुन्या युगाचे आदर्श....' वाचा नेमके काय म्हणाले राज्यपाल कोश्यारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 16:21 IST

विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षांत समारंभात आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, माजी मंत्री शरद पवार आणि केंद्रीय वाहतूक, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते डिलीट पदवीने सन्मानित करण्यात आले.

औरंगाबाद: आमच्या शालेय जीवनात तुमचा आवडता हिरो कोण? आदर्श कोण ? असे विचारले तर कोणी सुभाष चंद्र बोस, कोणी नेहरू असे सांगत. पण आता जर विचारले तुमचा हिरो कोण? आदर्श कोण ? तर कोठे बाहेर जाण्याची गरज नाही. येथे महाराष्ट्रातच तुम्हाला हिरो मिळतील. शिवाजी महाराज तर जुन्या युगाचे झाले, डॉ. आंबडेकर ते गडकरी हे आजच्या युगाचे आदर्श आहेत, असे मत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केले. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या ६२ व्या दीक्षांत समारंभात बोलत होते.  

विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षांत समारंभात आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, माजी मंत्री शरद पवार आणि केंद्रीय वाहतूक, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते डिलीट पदवीने सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना राज्यपाल कोश्यारी म्हणाले, शरद पवार यांनी शेती क्षेत्रात अभूतपूर्व काम केले आहे. ते राग आला तरी साखरेपेक्षा गोड असतात. गडकरी यांना तर आता रोडकरी म्हटले जात आहे. विद्यापीठाने देशातील या दोन नक्षत्रांचा प्रस्ताव दिला तेव्हा आनंद झाला. आणखी दोन विद्यापीठाचे देखील प्रस्ताव आहेत. या दोघांबद्दल आता बोलतोय कारण हे आपल्या समोर आहेत. आपल्यासाठी उदाहरण आहेत. यांचे कार्य अनेक पटींनी मोठे आहे. आम्ही शिक्षण घेत असताना. शिक्षक विचारायचे, तुमचा आदर्श कोण आहे. तर सुभाष चंद्र बोस, नेहरू सांगायचो. आता जर विचारले तर मला असे वाटते की बाहेर पाहण्याची गरज नाही. येथेच महाराष्ट्रात आदर्श मिळतील. शिवाजी महाराज तर जुन्या युगाचे झाले डॉ. आंबडेकर ते गडकरी हे आजच्या युगाचे आदर्श आहेत, असे मत कोश्यारी यांनी मांडले. याचा वक्तव्यावरून आता वादाला तोंड फुटले आहेत. 

व्हिजनरी सोबत मिशनरी व्हावे शरद पवार आणि नितीन गडकरी हे व्हिजनरी आहेत. गडकरी तर व्हिजनरी सोबत मिशनरी आहेत. व्हिजनरी सोबत ते कार्य 'मिशन' पूर्ण करण्यासाठी एक प्रकारचा वेडेपणा हवा. गडकरी आणि पवार यांना कोणतेही काम द्या ते पूर्ण करून दाखवतात.  येथून बाहेर पडताना देशाला विश्वगुरु करण्याचा संकल्प घेऊन जा. या ध्येय प्राप्तीसाठी इच्छशक्ती, संकल्पशक्ती प्रबळ पाहीजे. एकेकाळी देशात उपदेश जास्त दिला जात होता. आता देशात केवळ उपदेशापेक्षा हाती घेतलेले काम पूर्ण केले जाते. पंतप्रधान मोदींनी प्रत्येक घरात स्वच्छतागृह, प्रत्येकाचे बँक खाते काढून काम पूर्ण करून दाखवले. तुम्हीही संकल्प केला तर काहीही करू शकता मोदींपेक्षा मोठे बनू शकता, असेही राज्यपाल कोश्यारी म्हणाले. 

गुणवत्तावाढीसाठी सदैव सोबत - शरद पवारमला शैक्षणिक संस्थानची काळजी वाटते. त्यामुळे दर्जा सुधारण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सिद्ध करायचे असेल तर आपल्याला शैक्षणिक दर्जा सुधारावा लागेल. हे सर्व करण्यात सर्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अग्रेसर राहील, अशी अपेक्षा व्यक्त करतो.  आपण सर्व क्षेत्रात कसे आघाडीवर राहू याची काळजी घेऊ. आपल्यातील, मराठवाड्यासाठी अतीव आस्था असलेल्या सहकारी म्हणून गुणवत्ता वाढीसाठी कशी दोन पाऊले पुढे टाकू आणि यशस्वी होऊ या कार्यात सोबत राहील याचा विश्वास देतो, अशी ग्वाही देतो असेही शरद पवार म्हणाले. 

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबाद