औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिका उपमहापौर पदावर शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ हे विजयी झाले आहेत. त्यांना एकूण 51 मते पडली. त्यांच्याविरोधात भाजप पुरस्कृत उमेदवाराला 32 मते मिळाली तर एमआयएमच्या जाफर बिल्डर यांना केवळ १३ मते पडली. निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची मते फुटली.
शिवसेना-भाजप युती फिस्कटल्यानंतर भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे हे पद रिक्त झाले. त्यासाठी मंगळवारी निवडणूक झाली. महाविकास आघाडीत उपमहापौर पद काँग्रेसला जाणार का अशी चर्चा होती. मात्र, शिवसेनेने राजेंद्र जंजाळ यांना उमेदवारी दिली. आज झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे जंजाळ, काँग्रेसकडून अफसर खान, भाजप पुरस्कृत गोकुळ मलके, एमआयएमकडून जफर बिल्डर असे उमेदवार होते. यात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी जंजाळ यांना मतदान केले. जंजाळ यांना 51 मते पडली. भाजप पुरस्कृत मलके यांना 34 तर एमआयएमचे जफर यांना 13 मते मिळाली. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची मते फुटल्याची चर्चा आहे.
एमआयएमची वाताहत निवडणुकीत एमआयएमच्या उमेदवारास केवळ १३ मते पडली. पक्षाचे २४ सदस्य असताना केवळ १३ मते पडल्याने पक्षातील अतंर्गत कलह व मरजी उघड झाली आहे. काही सदस्यांनी अनुपस्थित राहणे पसंद केल्याने पक्षाची वाताहत झाल्याचे समोर आले आहे.
पक्षीय बलाबल शिवसेना - २९ भाजप - २३एमआयएम- २४काँग्रेस- ११राष्ट्रवादी - ०४ बीएसपी- ०५ रिपाइं डेमोक्रे टिक- ०२अपक्ष- १७