शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे गटाच्या रणनीती पुढे शिवसेनेचे डाव निष्प्रभ; औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायतीवर वर्चस्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 18:43 IST

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी शिंदे गटाच्या विरोधात जोरदार मोहीम उघडली होती.

औरंगाबाद: जिल्ह्यात  झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत शिंदे गटाने वर्चस्व राखले आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांचे डाव शिंदे सेनेतील आ. संजय शिरसाट , संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांच्या रणनीती पुढे निष्प्रभ ठरले. बंडखोरी नंतर झालेल्या पहिल्याच परीक्षेत शिंदे गटाने वर्चस्व मिळवल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका अधिक चुरशीच्या होतील असे चित्र आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात पैठण, सिल्लोड आणि औरंगाबाद पश्चिम या विधानसभा मतदारसंघातील ग्राम पंचायत निवडणुका पार पडल्या. या तिन्ही ठिकाणच्या ग्राम पंचायत निकालात शिंदे गटाचे वर्चस्व पाहायला मिळाल आहे. जिल्ह्यातील सेनेच्या पाच आमदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना कसे यश मिळते याकडे सर्वांचे लक्ष होते. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी शिंदे गटाच्या विरोधात जोरदार मोहीम उघडली होती. याला तेवढ्यात तोडीची रणनीती आखून प्रत्युत्तर आ. शिरसाट, सत्तार आणि भुमरे यांनी दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. 

थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या आ. संजय शिरसाट यांच्या मतदार संघातील वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीत १७ जागा होत्या. यातील तब्बल ११ जागा जिंकत शिंदे गटाने शिवसेनेला धक्का दिला आहे. येथे शिवसेनेला केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले. तर भाजपला दोन जागा मिळाल्या. 

अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोडमध्ये तीन ग्राम पंचायतीसाठी निवडणूक झाली. नानेगाव, उपळी, जंजाळा तिन्ही ग्रामपंचायतीवर शिंदे समर्थक गटाचा विजय झाला आहे. 

तसेच संदीपान भुमरे यांच्या पैठण तालुक्यातील ७ पैकी ६ ग्रामपंचायती शिंदे गटाचा झेंडा फडकला आहे. अपेगाव, खेर्डा, नानेगाव, शेवता, अनरनांदर, गावंतांडा या ग्रामपंचायती शिंदे गटाच्या ताब्यात आल्या आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSanjay Shirsatसंजय शिरसाटAbdul Sattarअब्दुल सत्तारSandeepan Bhoomraसंदीपान भुमरे