शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

महागाई विरोधात शिवसेनेचा 'आक्रोश'; संजय राऊत यांच्या नेतृवात औरंगाबादेत मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2021 12:45 IST

Shiv Sena Akrosh Morcha :संपूर्ण क्रांती चौक परिसरात भगवे झेंडे घेतलेल्या शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. 

औरंगाबाद : खा. संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी १२ वाजता  शिवसेनेचा महागाईविरोधात आक्रोश मोर्चा क्रांती चौक येथून निघाला. मोर्चात मराठवाड्यातील शिवसेना नेते आणि मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांचा समावेश आहे. संपूर्ण क्रांती चौक परिसरात भगवे झेंडे घेतलेल्या शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. 

क्रांती चौकातून विविध फोटो आणि, फलक घेऊन शिवसैनिक खा. संजय राऊत यांच्या नेतृत्वात मोर्चात सहभागी झाले आहेत. महागाई विरोधातील विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे. मोर्चा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, मंत्री संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, आ. मनीषा कायंदे, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाठ, प्रा. रमेश बोरनारे, उदयसिंह राजपूत, मंदार चव्हाण यांच्यासहा मराठवाड्यातील शिवसेनेचे अन्य नेते सहभागी आहेत. मोर्चाची सांगता गुलमंडी येथे होईल, अशी माहिती आयोजक जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांनी दिली. 

मोर्चा आधी मनसे जिल्हाप्रमुख आणि कार्यकर्ते ताब्यात दरम्यान, मनसेचे जिल्हाप्रमुख सुहास दाशरथे आणि कार्यकर्ते गुलमंडी येथे  शिवसेनेचा आक्रोश मोर्चा विरोधात आंदोलन करण्यासाठी सकाळी ११ वाजेदरम्यान जमा झाली. मात्र, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी जिल्हाप्रमुख सुहास दाशरथे यांनी, महागाई विराेधातील आक्रोश मोर्चा हे केवळ ढोंग आहे. त्या मोर्चाच्या निषेधार्थ मनसे आंदोलन आहे. शहरातील पाणीपट्टी कमी करून दाखवा, नंतर इतर महागाईवर बोलावे, असे आव्हान दिले. इंधनावरील कर कमी करून पेट्रोल, डिझेल स्वस्त करून महागाई कमी करता येणे शक्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादSanjay Rautसंजय राऊत