शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बंडखोर अब्दुल सत्तार उद्या सिल्लोडला येणार? रॅलीसाठी पोलिसांकडे मागितली परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 19:48 IST

सिल्लोड येथे कार्यकर्त्यांशी संवाद, रॅली काढत करणार शक्तीप्रदर्शन

सिल्लोड (औरंगाबाद) : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहटी येथे असलेले राज्यमंत्री अब्दुल सत्तार उद्या सिल्लोड येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी येणार असल्याची माहिती आहे. रविवारी सकाळी १० वाजता सिल्लोड शहरात विशेष हेलिकॉप्टरने ते येणार असल्याची माहिती हाती आली आहे.

महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समर्थनार्थ सिल्लोड येथे रविवारी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.  अब्दुल सत्तार यांना समर्थन देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन  शिवसेना तालुका प्रमुख देविदास पा. लोखंडे यांनी विविध सर्कल मधील कार्यकर्त्यांना केले आहे.

असा असेल उद्याचा कार्यक्रमरविवार ( दि.26 ) रोजी सकाळी 10 वाजता  प्रमुख पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणार आहे. त्यानंतर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे संपर्क कार्यालय येथून रॅलीला सुरुवात होणार आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे संपर्क कार्यालय ते प्रियदर्शनी चौक अशी रॅली मार्गस्थ होणार असून  प्रियदर्शनी चौक येथे रॅलीचे सभेत रूपांतर होवून सभे नंतर रॅलीचा समारोप होईल. 

समर्थनासाठी होणार शक्ती प्रदर्शन....मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि इतर बंडखोर आमदारांना समर्थन देण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रॅलीसाठी परवानगी मिळावी यासाठी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात अर्ज करण्यात आल्याची माहिती आहे. 

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ