शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना पदाधिकाऱ्याच्या एजन्सीने ४८४ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन, पीएफ, जीएसटी थकवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 18:05 IST

विद्यापीठ प्रशासनाने एजन्सीला कायदेशीर नोटीस बजावत सात दिवसांत कार्यवाही न केल्यास पोलिसांत गुन्हे नोंदविण्याचा इशारा प्रशासनाने दिला.

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठास कंत्राटी कर्मचारी पुरविणाऱ्या ‘महाराणा एजन्सी सेक्युरिटी अँड लेबर सप्लायर’ने ४८४ कर्मचाऱ्यांचा तीन महिन्यांचे 'पीएफ’चे ५० लाख आणि ‘जीएसटी'चे ३० लाख रुपये थकविले आहेत. त्याशिवाय कर्मचाऱ्यांचे दोन महिन्याचे वेतनही दिले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने एजन्सीला कायदेशीर नोटीस बजावत सात दिवसांत कार्यवाही न केल्यास पोलिसांत गुन्हे नोंदविण्याचा इशारा प्रशासनाने दिला. ही एजन्सी शिवसेना पक्षाचे पदाधिकारी विश्वनाथ राजपूत यांची असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.

विद्यापीठ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठाने कंत्राटी कर्मचारी पुरविणाऱ्या ‘महाराणा एजन्सी सेक्युरिटी अँड लेबर सप्लायर’ला २५ ऑक्टोबर २०२४ रोजी कर्मचारी पुरविण्याचे कंत्राट दिले. त्यानुसार विद्यापीठास कुशल व अकुशल असे एकूण ४८४ कंत्राटी कर्मचारी पुरविण्याचा करार झाला. संबंधित कंत्राटदाराने दर महिन्याच्या सात तारखेच्या आत कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर वेतन जमा करून नंतर विद्यापीठाकडे देयक सादर करणे बंधनकारक आहे. तसेच त्याच महिन्यात कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी (पीएफ), 'जीएसटी'ची रक्कम भरणेही बंधनकारक आहे. मात्र, कंत्राटदाराने करारातील अटी, शर्तींचा वारंवार भंग केला. त्याविषयी विद्यापीठ प्रशासनाने एजन्सीला दहा वेळा पत्र पाठविले. तेव्हा कंत्राटदाराने केवळ पहिल्या महिन्याचा पन्नास टक्के पीएफ जमा केला. जीएसटीची चार महिन्यांची तीस लाखांची रक्कमही थकविली आहे. तसेच ४८४ रोजंदारी कर्मचाऱ्यांचे मार्च व एप्रिल महिन्यांचे वेतनही थकविले आहे. त्याशिवाय कर्मचाऱ्यांना आजपर्यंत एकाही महिन्याची वेतन पावती दिलेली नाही. या नियमभंगामुळे कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या आदेशावरून ॲड. नितीन कांबळे यांच्यामार्फत १६ मे रोजी कायदेशीर नोटीस बजावली आहे.

कर्मचाऱ्यांचा उत्सवातही केला नाही पगारएजन्सीने गुढीपाडवा, रमजान ईद, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, अक्षय तृतीया इ. सण, उत्सव असल्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन करण्याची सूचना विद्यापीठ प्रशासनाने केली. तसेच कर्मचाऱ्यांनीही वारंवार विनंती एजन्सीकडे केली होती. तरीही एजन्सीने कर्मचाऱ्यांचे वेतन दिले नाही.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर